'फेसबुक'वरील कमेंट प्राध्यापकाला पडली महागात

 'फेसबुक'वर कमेंट करणं एका प्राध्यापकाला चांगलंच महागात पडलंय. सोशल वेबसाइटवर आक्षेपार्ह कमेंट करण्याऱ्याबद्दल आता कडक कारवाई करण्यात येते. असं असतांनाही अनेक जण आक्षेपार्ह कमेंट करत असतात.

PTI | Updated: Jul 24, 2014, 01:31 PM IST
'फेसबुक'वरील कमेंट प्राध्यापकाला पडली महागात title=

अलिगढ:  'फेसबुक'वर कमेंट करणं एका प्राध्यापकाला चांगलंच महागात पडलंय. सोशल वेबसाइटवर आक्षेपार्ह कमेंट करण्याऱ्याबद्दल आता कडक कारवाई करण्यात येते. असं असतांनाही अनेक जण आक्षेपार्ह कमेंट करत असतात.

आपल्या कमेंटमुळं संबंधित प्राध्यापकाला निलंबित करण्यात आलंय. सैय्यद ‍रिझवी असं या प्राध्यापकाचं नाव आहे. अलिगड मुस्लिम विद्यापीठाचे कुलगुरू ‘बिंडोक’असल्याची कमेंट सैय्यद रिझवी यांनी केली होती. या आक्षेपार्ह कमेंटमुळं विद्यापीठानं रिझवी यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

आपल्या देशात लोकशाही आहे. त्यामुळं आपल्याला आपलं मत व्यक्त करण्याचा पूर्ण अधिकार असल्याचं सैय्यद रिझवी यांनी म्हटलं आहे. मात्र, रिझवी यांचं कमेंट आक्षेपार्ह असून विद्यापीठ प्रशासनानं त्यांना निलंबित केलंय. विशेष म्हणजे रिझवी यांना अलिगडच्या बाहेर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.