10

कटरा-उधमपूर रेल्वेला पंतप्रधानांचा हिरवा झेंडा

 पंतप्रधान नरेंद्र मोदी आज प्रथमच काश्मीर भेटीवरगेले आहेत. ते कटरा-उधमपूर रेल्वेला ते या दौ-यात हिरवा झेंडा दाखवला. वैष्णोदेवी यात्रेला जाणा-या यात्रेकरूंना या मार्गाची मोठी मदत होणार आहे.

इराकमधील 46 नर्स सुरक्षित, सरकारचा दावा

 इराकमध्ये अडकून पडलेल्या ४६ भारतीय नर्सचा सुटकेचा मार्ग अवघड असल्याचेच सष्ट झाले आहे. 'आयएसआयएस' या दहशतवाद्यांच्या संघटनेने सर्व नर्सना अज्ञातस्थळी हलविले आहे. या ठिकाणी बॉम्बवर्षाव होत असून काही नर्स जखमी झाल्याचे वृत्त आहे. तर सरकारकडून त्या सुरक्षित असल्याचा दावा करण्यात येत आहे.

नोकरीच्या पहिल्याच दिवशी रेप, शोरूमच्या मालकाला अटक

ऑप्टिकल शोरूममध्ये सेल्सगर्लची नोकरी लागल्यावर पहिल्या दिवशी ड्यूटीवर अनर्थ घडला. पहिल्या दिवशी तिने रेप झाल्याची तक्रार दाखल केली.  दुकानाच्या ६१ वर्षीय मालकाला अटक करण्यात आली आहे. महिला घटस्फोटीत असून ती लिव-इन रिलेशनशीपमध्ये राहत आहे. तर आरोपी मालक पहिल्या पत्नीच्या निधनानंतर दुसऱ्या पत्नीसह राहत आहे. 

आईच्या टोमण्याने त्याने नदालला हरवले

 वर्ल्ड नंबर राफेल नदालला तू पराजित करू शकत नाही, असा टोमणा आईने मारल्यामुळे चिडून विम्बल्डनमध्ये तरुण वादळ ठरलेल्या निक किर्गीयोस चक्क नदालला हरवले. 

फ्रान्समध्ये बुरखा घालण्यावर बंधन कायम

युरोपीय मानवाधिकार न्यायालयाने फ्रान्समध्ये बुरखा घालण्याचं बंधन कायम ठेवलं आहे.

शेअर मार्केटमध्ये तेजी, सेंसेक्सचा नवा उच्चांक

 सेंसेक्सने आज बाजारमध्ये मोठी उडी घेतली. आतापर्यंत सर्वाधिक नवा उच्चांक केलाय. सेंसेक्सने 25,735 झेप घेतली. सेन्सेक्सची आत्तापर्यंत सर्वात मोठी उसळी दिसून आली आहे. सेन्सेक्स 25735 अंशांवर, तर निफ्टी 7 हजार 700च्या जवळ होता.

सेक्स रॅकेट चालविणारी महिला अटकेत

 ग्वाल्हेरच्या बहोडापूर भागात सेक्स रॅकेट चालविणाऱ्या महिलेला रेल्वे स्टेशनवरून सीएसपीच्या स्कॉडने अटक केली. ही महिला शहरातून पळून जाण्याच्या बेतात होती. ती स्टेशनवर ट्रेनची वाट पाहत होती. या महिलेची चौकशी करण्यात आली तेव्हा तीने या सेक्स रॅकेटमध्ये सामिल असलेल्या इतर महिलांचीही नावे सांगितली.या महिलांच्या घरी ती ग्राहकांना पाठवत होती.  

अमेरिकेनं दिले होते भाजपच्या हेरगिरीचे आदेश

भारताचा प्रमुख राजकीय पक्ष भाजपसह जगातील सहा प्रमुख पक्षांवर पाळत ठेवण्याचा परवाना अमेरिकेन कोर्टानं २०१० साली नॅशनल सिक्युरिटी एजन्सीला (एनएसए) दिल्याचा गौप्यस्फोट ‘दि वॉशिंग्टन पोस्ट’ या प्रमुख अमेरिकन वृत्तपत्रानं केलाय.

‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ सुरू करणार 5000 नवे ATM

मुंबईः चालू आर्थिक वर्षात स्टेट बँक ऑफ इंडिया तब्बल पाच हजार एटीएम सुरू करणार आहे. डेबिट कार्डमागे एटीएम व्यवहारांचं प्रमाण वाढवण्यासाठी बँकेनं हा निर्णय घेतला आहे. एटीएम मशिन्सची उपलब्धता ही समस्या असून मशिन्स जसजसे मिळतील तशी एटीएमची संख्या वाढवली जाईल, असं बँकेचे एमडी कृष्णकुमार यांनी सां‌गितलंय.

गोव्यात स्कर्टवर बंदीची मंत्र्यांची मागणी

 गोव्यातील मनोहर पर्रीकर सरकारमधील सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदीन ढवळीकर यांनी तरुणींच्या स्कर्टवर वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ढवळीकर यांनी गोव्याच्या नाईटक्लमबमध्ये तरुणींनी छोटे स्कर्ट घालण्यावर बंदीची मागणी केली आहे. तरुणींचे छोटे स्कर्ट गोव्याच्या संस्कृतीला धोका असल्याचे ढवळीकर म्हणत आहेत.