10
10
फुटबॉल वर्ल्डकप मॅच आपल्या अखेरच्या टप्प्यात आलेला आहे. यजमान ब्राझील टीमचा सेमिफायनलमधील पराभव अनेकांच्या जिव्हारी लागलाय. नेपाळमधील एका अल्पवयीन मुलीनं ब्राझिलच्या पराभवाचा धसका घेत चक्क आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय.
अडीच लाखांपर्यंतच्या वार्षिक उपन्न मिळवणा-यांना इन्कम टॅक्समधून वगळण्यात आले आहे. तर ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना ही मर्यादा तीन लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या प्राथमिक २ लाख रूपयांच्या मर्यादेत तब्बल ५० हजारांची वाढ करून अर्थमंत्र्यांनी नोकरदारांना दिलासा दिला आहे.
अर्जेन्टीनानं पेनल्टी शूटआऊटमध्ये बाजी मारत वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये आपला प्रवेश निश्चित केला.
भारतच्या इंग्लंड दौऱ्याला आजपासून सुरुवात होतेय. पहिली टेस्ट ट्रेंटब्रिजमध्ये रंगणार आहे. 2011 च्या दौऱ्यात भारताला 4-0 नं सपाटून मार खावा लागला होता. या पराभवचा वचपा काढण्यासाठी टीम इंडिया आतूर असणार आहे.
केंद्रीय रेल्वे मंत्री सदानंद गौडा यांनी मंगळवारी नविन ५८ गाड्यांची घोषणा केली. यात पाच जनसाधारण, पाच प्रीमियम, सहा एसी ट्रेन, 27 एक्सप्रेस ट्रेन, आठ पॅसेंजर ट्रेन, दोन MEMU सेवा आणि पाच DEMU गाड्यांची घोषणा केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वे अर्थसंकल्पाचे स्वागत केलेय. या अर्थसंकल्पात देशातील सर्वच घटकाचा विचार करण्यात आला आहे. रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी सादर केलेल्या बजेटमुळे रेल्वेचा विस्तार होणार असून, विकासही साधला जाणार आहे, अशी प्रतिक्रिया मोदी यांनी व्यक्त केली.
देशातील पहिली 'बुलेट ट्रेन' मुंबई - अहमदाबाद अशी सुरू करण्याचा मनोदय व्यक्त रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी व्यक्त केला. तसेच मुंबई लोकलला स्वयंचलित दरवाजे आणि स्टेशनवर सरकते जिने बसविण्यात येणार आहेत. तर राज्यात काही हायस्पीड ट्रेन सुरु करण्यात आल्या आहेत.
रेल्वेमध्ये आतापर्यंत राजकारण केले गेले. मात्र, आता रेल्वेचा विकास होईल, असे प्रतिपादन रेल्वे मंत्री सदानंद गौडा यांनी येथे केले.
परिस्थिती ओळखून त्यानुसार योग्य तो निर्णय घेणं म्हणजे महेंद्र सिंह धोनीची खासियत आहे. मात्र मागील सात वर्षात भारताला आपल्या कॅप्टनसीनं सर्वोच्च स्थानावर नेणारा खेळाडू म्हणतो त्याच्या अंतरात्माचा आवाज तर्क-वितर्कांवर आधारित आहे. धोनीनं आपल्या 33व्या वाढदिवसानिमित्त 2007मध्ये ट्वेंटी-20 वर्ल्डकप पूर्वी सीनिअर खेळाडू असतांनाही महत्त्वाची जबाबदारी आणि आपल्या कप्तानी शैलीबाबत चर्चा केली.
पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण केंद्रांमध्ये मुंबईवर दहशतवादी हल्ला करणाऱ्या कसाबवर धडे दिले जात असल्याची माहिती उघड झाली आहे. यात कसाबनं दहशतवादी हल्ल्यांमध्ये केलेल्या चुका दाखवल्या जात असून या चूका कशा टाळता येतील यावर माहिती दिली जात आहे.