धावत्या रिक्षात महिलेवर सामूहिक बलात्कार

पश्चिम बंगालमधील दक्षिण २४ परगना जिल्ह्यात पाच नराधमांनी एका महिलेवर धावत्या रिक्षात सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बलात्कारानंतर नराधमांनी पीडित महिलेला बेशुद्धावस्थेत रिक्षेच्या बाहेर फेकून दिलं होतं.

PTI | Updated: Aug 3, 2014, 05:13 PM IST
धावत्या रिक्षात महिलेवर सामूहिक बलात्कार title=

कोलकाता: पश्चिम बंगालमधील दक्षिण २४ परगना जिल्ह्यात पाच नराधमांनी एका महिलेवर धावत्या रिक्षात सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बलात्कारानंतर नराधमांनी पीडित महिलेला बेशुद्धावस्थेत रिक्षेच्या बाहेर फेकून दिलं होतं.

दक्षिण २४ परगना जिल्ह्यातील अक्रा गावात २४ वर्षीय महिला तिच्या आईसोबत राहत होती. महिलेला दोन लहान मुल असून तिचा पती तिला सोडून निघून गेला होता. पीडित महिलेचे साफिक नामक व्यक्तीशी संबंध होते. साफीकने दोन दिवसांपूर्वी रात्री त्या महिलेला भेटायला बोलवले. पीडित महिलेला नंबर प्लेट नसलेल्या एका रिक्षात बसवलं होतं. या रिक्षात साफीकचे चार मित्रही बसले होते. 

रिक्षात बसल्यावर महिलेला गुंगीचं औषध देऊन साफिक आणि त्याच्या पाच मित्रांनी धावत्या रिक्षातच तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. बलात्कारानंतर नराधमांनी तिला गावातील रस्त्यावर फेकून दिलं. काही वेळानं ग्रामस्थांना पीडित महिला बेशुद्धावस्थेत आढळली आणि हा प्रकार उघड झाला.  याप्रकरणी पोलिसांनी साफिकच्या चार मित्रांना अटक केली असली तरी मुख्य आरोपी साफिक अद्याप पसार आहे.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.