७२ टक्के रेप आरोपी हे बॉयफ्रेंड्स

 मुंबईतील ७१.९ टक्के  बलात्कार प्रकरणात मुलीचा बॉयफ्रेंडचं आरोपीच्या पिंजऱ्यात उभा आहे, लग्नाचे आमिष दाखवून हे बलात्कार घडल्याची धक्कादायक बाब ऑक्टोबर महिन्यात उघड झालेल्या अहवालात ही समोर आली आहे.

PTI | Updated: Nov 27, 2014, 03:34 PM IST
 ७२ टक्के रेप आरोपी हे बॉयफ्रेंड्स title=

मुंबई :  मुंबईतील ७१.९ टक्के  बलात्कार प्रकरणात मुलीचा बॉयफ्रेंडचं आरोपीच्या पिंजऱ्यात उभा आहे, लग्नाचे आमिष दाखवून हे बलात्कार घडल्याची धक्कादायक बाब ऑक्टोबर महिन्यात उघड झालेल्या अहवालात ही समोर आली आहे.

पोलिसांकडून एकत्र करण्यात आलेल्या माहितीनुसार एकूण ५४२ बलात्काराची प्रकरणं मुंबईत यावर्षी नोंदविण्यात आलीत. यातील ३८९ टक्के प्रकरण म्हणजे ७१.९ टक्के  हा बलात्कार महिलेच्या बॉयफ्रेंडनेच केल्याची तक्रारी करण्यात आल्या आहेत.  यात लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचे प्रकार सर्वाधिक आहेत, असे मुंबईचे पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी आज सांगितले. 

यातील सहा टक्के बलात्कार हे अनोळखी व्यक्तीकडून केले गेले आहेत. पण इतर प्रकरणात आरोपी हा एकतर पीडितेचा नातेवाईक किंवा जोडीदार असल्याचेही त्यांनी सांगितले. 
मुंबई महानगरात बलात्काराच्या वाढत्या घटनांबाबत पत्रकारांनी राकेश मारिया यांना विचारले असता ते बोलत होते. 

३१ ऑक्टोबरपर्यंत ५४२ केस नोंदविण्यात आल्या आहेत. यातील ४७७ प्रकरणांचा छडा लावला आहे. या कालावधीत मागील वर्षी ३३३ केस दाखल झाल्या होत्या. त्यातील ३१६ प्रकरणांचा छडा लावण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले. 

आम्ही नागरिकांना आवाहन करीत आहोत की पुढे या आणि तक्रार दाखल करा. ज्या महिलांवर लैंगिक अत्याचार झाला आहे, त्यांनी मनात भीती न  बाळगता पोलिसांकडे येत आहेत, असेही मारियांनी सांगितले. 
अधिक नागरिकांनी पोलिसांशी संपर्क केला त्यामुळे केसेस वाढल्या आहेत. त्यामुळे नोंदलेल्या प्रकरणाची संख्या वाढली आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.