जम्मू-काश्मीर आणि झारखंडमध्ये आज दुसऱ्या टप्प्याचं मतदान

जम्मू आणि काश्मीरमध्ये पहिल्या टप्प्यात रेकॉर्डब्रेक मतदानानंतर आज दुसऱ्या टप्प्याचं मतदान होत आहे. १८ विधानसभेच्या जागांसाठी मतदान होणार असून जम्मूच्या ९ तर काश्मीरच्या ९ जागांवर मतदान होतंय.

PTI | Updated: Dec 2, 2014, 08:31 AM IST
जम्मू-काश्मीर आणि झारखंडमध्ये आज दुसऱ्या टप्प्याचं मतदान title=

श्रीनगर/रांची: जम्मू आणि काश्मीरमध्ये पहिल्या टप्प्यात रेकॉर्डब्रेक मतदानानंतर आज दुसऱ्या टप्प्याचं मतदान होत आहे. १८ विधानसभेच्या जागांसाठी मतदान होणार असून जम्मूच्या ९ तर काश्मीरच्या ९ जागांवर मतदान होतंय.

पहिल्या टप्प्यात १५ जागांसाठी रेकॉर्डब्रेक ७१.२८% मतदानाची नोंद झाली होती. त्यामुळं दुसऱ्या टप्प्याच्या मतदानापूर्वी जोरदार प्रचार झाल्याचं पहायला मिळालं. 

मतदानादरम्यान दहशतवादी हल्ल्याची शक्यता असल्यानं कडक बंदोबस्त ठेवण्यात आलाय. १८ जागांसाठी १७५ उमेदवार उभे असून तब्बल १५ लाख ३५ हजार नागरिकांना मताधिकार असणार आहे.

तर झारखंडमध्ये दुसऱ्या टप्प्यात २० मतदारसंघात मतदान होणार आहे. त्यातील १६ सीट्स आदिवासींसाठी राखीव आहे. माजी मुख्यमंत्री अर्जुन मुंडा, मधू कोडा यांच्यासह २२३ जणांचं भविष्य आज मतदानयंत्रात बंद होणार आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.