कानपूर: आयआयटी कानपूरमध्ये प्लेसमेंटच्या पहिल्याच दिवशी बीटेक, बीटेक ड्यूएल डिग्री आणि एमटेकच्या १५३ विद्यार्थ्यांना नोकरीचं ऑफर लेटर मिळालंय आणि जास्तीत जास्त वार्षिक सॅलरी पॅकेज ६० लाख रुपयांपर्यंत दिलंय. आयआयटी प्रशासनानुसार जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ४५ ते ६० लाख रूपयांचं वार्षिक वेतन पॅकेज देण्यात आलंय.
आयआयटी कानपूरच्या प्लेसमेंट सेलचे अध्यक्ष प्रा. दीपू फिलिप यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, प्लेसमेंटची प्रक्रिया आजपासून सुरू होईल. तर प्लेसमेंटसाठी जवळपास ५० देशी-परदेशी कंपन्या आलेल्या आहेत. आज ४० कंपन्या येणार आहेत. सोमवारी दुपारी निवड प्रक्रिया सुरू झाली आणि रात्री साडे अकरा वाजेपर्यंत चालली. यात मल्टीनॅशनल कंपन्यांपासून देशातील नामवंत कंपन्या आणि सार्वजनिक क्षेत्रातील भारतीय उपक्रमांचा समावेश आहे.
त्यांनी सांगितलं की, सर्वाधिक ३८ विद्यार्थ्यांना अॅनॉलिटिकल कंपनी एएक्सएल सर्व्हिसेदनं ऑफर लेटर दिलंय. ती कंपनी आणखीही विद्यार्थ्यांची निवड करणार आहे. त्याचे प्रमुख डॉ. विक्रम सिंह आयआयटी कानपूरचे माजी विद्यार्थी आहेत आणि आताही आयआयटीच्या अनुसंधान आणि इतर योजनांसोबत जोडल्या गेलेले आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.