माझ्यावर किशोरवयात बलात्कार - पॉप स्टार लेडी गागा

पॉप स्टार लेडी गागाने मोठा खुलासा केलाय. माझ्यावर किशोरवयात बलात्कार झाला होता. हा काळ दु:खदायक होता. हा हादऱ्यातून आपण काही काळ घालवलाय. मला या धक्क्यातून बाहेर येण्यासाठी भावनिक उपचार घेण्याची वेळ आली.

PTI | Updated: Dec 3, 2014, 12:36 PM IST
माझ्यावर किशोरवयात बलात्कार - पॉप स्टार लेडी गागा  title=

लॉस एंजेल्सि : पॉप स्टार लेडी गागाने मोठा खुलासा केलाय. माझ्यावर किशोरवयात बलात्कार झाला होता. हा काळ दु:खदायक होता. हा हादऱ्यातून आपण काही काळ घालवलाय. मला या धक्क्यातून बाहेर येण्यासाठी भावनिक उपचार घेण्याची वेळ आली.

हॉवर्ड स्टर्नला दिलेल्या मुलाखतीच्यावेळी लेडी गागाने हा खुलासा केलाय. २८ वर्षीय गागाने मुलाखतीमध्ये काही आठवणी शेअर केल्या. यावेळी १९ वर्षांची असताना मला लैंगिक छळाचा सामना करावा लागला. या घटनेनंतर मी या दु:खत घटनेचा सामना करीत आले आहे.

मी आता ही घटना विसरुन गेली आहे. मला पूर्वीप्रमाणे मोकळी वाटत आहे. मी हसू शकते. कारण मी मानसिक आणि शारीरिक उपचार घेतले. भावनिक उपचारांचा आधार घेतल्याने मला हे सहज शक्य झाले. माझ्यासाठी संगीत हे एक चमत्कारिक ठरले. त्यामुळे मी लवकर सावरु शकले. तो काळ भयानक होता. मी माझी नव्हती. त्यावेळी मी १९ वर्षांची होती. मी हे आधी सांगितले नाही, कारण त्या हल्लेखोराने क्रेडिट घेऊन त्याला अधिक प्रेरणा मिळाली असती. मला हे टाळायचे होते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.