इसिसच्या आरिबला 31 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

इसिस या अतिरेकी संघटनेत सक्रिय झालेला कल्याण इथल्या आरिब माजिदला याची चौकशी संपली असून, त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करावी, अशी मागणी करणारा अर्ज बुधवारी स्वत:हून राष्ट्रीय तपास यंत्रणेनं विशेष न्यायालयात केला तो ग्राह्य धरत कोर्टानं आरिबला 31 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली़

PTI | Updated: Dec 18, 2014, 12:32 PM IST
इसिसच्या आरिबला 31 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी title=

मुंबई: इसिस या अतिरेकी संघटनेत सक्रिय झालेला कल्याण इथल्या आरिब माजिदला याची चौकशी संपली असून, त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करावी, अशी मागणी करणारा अर्ज बुधवारी स्वत:हून राष्ट्रीय तपास यंत्रणेनं विशेष न्यायालयात केला तो ग्राह्य धरत कोर्टानं आरिबला 31 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली़

आरिबच्या पोलीस कोठडीची मुदत 22 डिसेंबरला संपत असताना त्याआधीच एनआयएनं स्वत: त्याला न्यायालयात हजर करून त्याची चौकशी संपली असल्याचं जाहीर केलें विशेष न्यायाधीश यतीन डी़ शिंदे यांच्यासमोर आरिबला हजर करण्यात आले.

त्यावेळी त्याच्या वकिलानं ही अर्ज करून आरिफच्या नातेवाईकांना कारागृहात भेटू देण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती केली. तसंच आरिफला काहीही कबूल करायचं नसून तो निर्दोष आहे, असा दावाही त्याच्या वकिलानं केला या अर्जाची कोर्टानं नोंद करून घेतली. मे महिन्यात धार्मिक यात्रेला गेलेला आरिब आणि त्याचे मित्र अतिरेकी संघटनेत सक्रिय झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर एकच खळबळ उडाली़ अखेर अरीबला भारतात आणायला गुप्तचर संघटनेला यश आलं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.