जीएसएलव्ही मार्क ३ या प्रक्षेपक यानाचे यशस्वी प्रक्षेपण

मंगळ मोहीम यशस्वी केल्यानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रोने आज अंतराळ क्षेत्रात आणखी एक दमदार पाऊल पुढे टाकलेय. जीएसएलव्ही मार्क ३ या प्रक्षेपक यानाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलेय.

PTI | Updated: Dec 18, 2014, 10:25 AM IST
जीएसएलव्ही मार्क ३ या प्रक्षेपक यानाचे यशस्वी प्रक्षेपण title=

श्रीहरीकोटा : मंगळ मोहीम यशस्वी केल्यानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रोने आज अंतराळ क्षेत्रात आणखी एक दमदार पाऊल पुढे टाकलेय. जीएसएलव्ही मार्क ३ या प्रक्षेपक यानाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलेय.

मार्क ३ मुळे इस्त्रोला अंतराळात चार हजार टनाचे उपग्रह सोडणे शक्य झाले आहे. तसेच या माध्यमातून मानवाला अंतराळात पाठवण्याच्या दिशेनेही इस्त्रोने मोठी झेप घेतली आहे.या प्रक्षेपकाचे वजन तब्बल ६०० टन एवढं आहे. म्हणजेच PSLV या इस्त्रोच्या भरवशाच्या प्रक्षेपकापेक्षा दुपटीपेक्षा जास्त तर जीएसएलव्ही मार्क १ आणि मार्क २ पेक्षा ५० टक्के अधिक आहे.

आजच्या चाचणीद्वारे आपण GSLV MK -||| या शब्दश: अवाढव्य असलेल्या प्रक्षेपकाची सिद्धता तपासणार आहोत. या मोहीमेद्वारे क्रू मॉडेल रिट्राय ऍटमॉसफेरिक एक्सपेरिमेंट म्हणजे केअर हा प्रयोग करणार आहोत. सुमारे ३.७ टन वजनाचे Crew Model म्हणजेच अंतराळ कूपी आपण अवकाशात पाठवणार आहोत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.