श्रीहरीकोटा : नव्या हनुमान उड़ीसाठी इस्रो सज्ज झालीय. संपूर्णत: नव्या आकाराचे GSLV मार्क 3 या प्रक्षेपकाची पहिली चाचणी आज घेतली जाणार आहे.
या प्रक्षेपकाचे वजन तब्बल 630 टन एवढं आहे. म्हणजेच PSLV या इस्त्रोच्या भरवशाच्या प्रक्षेपकापेक्षा दुपटीपेक्षा जास्त तर GSLV मार्क 1 आणि मार्क 2 पेक्षा 50 टक्के अधिक आहे.
आजच्या चाचणीद्वारे आपण GSLV MK -||| या शब्दश: अवाढव्य असलेल्या प्रक्षेपकाची सिद्धता तपासणार आहोत. या मोहीमेद्वारे क्रू मॉडेल रिट्राय ऍटमॉसफेरिक एक्सपेरिमेंट म्हणजे केअर हा प्रयोग करणार आहोत. सुमारे 3.7 टन वजनाचे Crew Model म्हणजेच अंतराळ कूपी आपण अवकाशात पाठवणार आहोत.
ही अंतराळ कूपी रॉकेटने अवकाशात झेप घेतल्यावर साधारण 20 मिनिटांत बंगालच्या उपसागरात पैराशूटच्या सहाय्याने उतरणार आहे. तर या कुपिची ताकद, क्षमताही आज तपासली जाणार आहे. कारण याच प्रकारच्या कुपीतुन पुढच्या काळात आपण अंतराळवीर अवक़ाशात पाठवणार आहोत, समानवी अवकाश मोहीम हाती घेणार आहोत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.