नवी दिल्ली : स्वयंपाकाच्या गॅसवरील अनुदान नवीन वर्षापासून थेट ग्राहकांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
अनुदान ग्राहकाकडे हस्तांतरित करण्यासाठी आधार क्रमांक अनिवार्य नसल्याचे स्पष्टीकरण सोमवारी सरकारने संसदेत दिले. थेट लाभ हस्तांतरण योजनेंतर्गत स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरवरील अनुदान संबंधित ग्राहकाच्या बँक खात्यातही जमा केले जाऊ शकते, असे सरकारने स्पष्ट केले.
ग्राहकाकडे आधार क्रमांक नसल्यास अनुदानाची रक्कम त्याच्या बँक खात्यात जमा केली जाईल. नवीन नियमावलीनुसार, आधार क्रमांक नाही म्हणून कुणालाही अनुदान नाकारले जाणार नाही, असे पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी लोकसभेत सांगितले.
थेट लाभ हस्तांतरण योजना जिल्ह्यात सुरू झाल्यापासून तीन महिन्यांच्या काळात यामध्ये सहभागी होणे गरजेचे आहे. देशात स्वत:हून अनुदानित स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचा वापर नाकारणार्यांची संख्या १२,४५० पर्यंत पोहोचली आहे. तर देशभरात १० कोटी आधार क्रमांक बँक खात्याशी जोडले आहेत, अशी माहिती भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणने दिली
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.