इशाऱ्यानंतरही पाकिस्तानी रेंजर्सचा भारतीय चौक्यांवर गोळीबार

जम्मू जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवरील सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) चौक्यांवर आज सकाळी पाकिस्तानी रेंजर्सकडून गोळीबार करण्यात आला.

PTI | Updated: Jan 25, 2015, 06:24 PM IST
इशाऱ्यानंतरही पाकिस्तानी रेंजर्सचा भारतीय चौक्यांवर गोळीबार title=

जम्मू: जम्मू जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवरील सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) चौक्यांवर आज सकाळी पाकिस्तानी रेंजर्सकडून गोळीबार करण्यात आला.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू जिल्ह्यातील आरएस पुरा सेक्टरमधील बीएसएफच्या जोगवाना पोस्टवर आज सकाळी पाकिस्तानी सैन्याकडून जोरदार गोळीबार करण्यात आला. सुमारे पंधरा मिनीटं चाललेल्या गोळीबारात पाककडून आधुनिक शस्त्रास्त्रांचा वापर करण्यात आला. या गोळीबाराला बीएसएफच्या जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिलं.

अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा भारत दौऱ्यावर आले असून, त्यापूर्वीच पाककडून हा गोळीबार करण्यात आला आहे. ओबामांच्या दौऱ्यामुळे लष्कराकडून सीमेवर कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.