२०१६ चा टी-२० क्रिकेट वर्ल्डकप भारतात

भारतात २०१६ चा  टी-२० क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धा खेळविण्यात येणार आहे. याबाबत गुरुवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (आयसीसी) सांगण्यात आले. 

PTI | Updated: Jan 30, 2015, 07:56 AM IST
२०१६ चा  टी-२० क्रिकेट वर्ल्डकप भारतात title=

नवी दिल्ली : भारतात २०१६ चा  टी-२० क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धा खेळविण्यात येणार आहे. याबाबत गुरुवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (आयसीसी) सांगण्यात आले. 

आयसीसीने प्रसिद्ध केलेल्या वेळपत्रकामध्ये २०१६ मध्ये होणारी वर्ल्डकप स्पर्धा भारतात होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. ही स्पर्धा ११ मार्च आणि ३ एप्रिल या कालावधीत खेळविली जाणार आहे. तसेच या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत सामना टाय झाल्यास सुपर ओव्हरमध्ये निकाल लागणार असल्याचेही, आयसीसीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

भारतात २०११ मध्ये झालेल्या एकदिवसीय क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेनंतर प्रथमच आयसीसीची स्पर्धा होत आहे. यापुढील एकदिवसीय क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धा २०१९मध्ये इंग्लंडमध्ये खेळविण्यात येणार आहे.

मागील टी-२० क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धा बांगलादेशमध्ये खेळविण्यात आली होती. या स्पर्धेत श्रीलंकेने भारताचा पराभव करून विजेतेपद मिळविले होते.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.