देशभरात MBBSच्या २५०० जागा वाढणार

एमबीबीएसला अॅडमिशन घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. देशभरात विविध मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसच्या जवळपास २५०० जागांमध्ये वाढ केली जाणार आहे. आरोग्य विभागाच्या अधिकृत समितीनं जागांच्या वाढीला मंजुरी दिलीय.

PTI | Updated: Jan 21, 2015, 08:31 AM IST
देशभरात MBBSच्या २५०० जागा वाढणार  title=

नवी दिल्ली: एमबीबीएसला अॅडमिशन घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. देशभरात विविध मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसच्या जवळपास २५०० जागांमध्ये वाढ केली जाणार आहे. आरोग्य विभागाच्या अधिकृत समितीनं जागांच्या वाढीला मंजुरी दिलीय.

आरोग्य मंत्रालयाचे सचिन लव वर्मा यांच्या नेतृत्वातील समितीनं नुकत्याच आपल्या बैठकीमध्ये एमबीबीएसच्या जवळपास अडीच हजार जागा वाढवायला मंजुरी दिलीय. आरोग्य मंत्रालयाच्यावतीनं जारी करण्यात आलेल्या पत्रकानुसार समितीनं यासोबतच विविध हॉस्पिटल्समध्ये नवे मेडिकल कॉलेज सुरू करायलाही मंजुरी दिलीय. नव्या जागा नव्या आणि सध्याच्या मेडिकल कॉलेजमध्ये येतील.

हा निर्णय २०१४-२०१५च्या पदवीच्या जागांमध्ये ११७० ची कमी झाल्यानंतर घेतलाय. कारण मेडिकल काउंसिल ऑफ इंडियानं ३९२० जागांचा प्रस्ताव फेटाळून २७५० जागांना मंजुरी दिलीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.