आयपीएल प्रकरणात माझं नाव येतंच राहणार, धोनीची नाराजी

 आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी महेंद्रसिंग धोनीनं अखेर मौन सोडलं असून याप्रकरणात माझ्याविरोधात कोणताही ठोस पुरावा सापडलेला नाही. पण तरीदेखील याप्रकरणात माझं नाव गोवणं सुरुच राहील अशा शब्दात धोनीनं नाराजी व्यक्त केली. 

PTI | Updated: Jan 25, 2015, 06:51 PM IST
आयपीएल प्रकरणात माझं नाव येतंच राहणार, धोनीची नाराजी  title=

सिडनी: आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी महेंद्रसिंग धोनीनं अखेर मौन सोडलं असून याप्रकरणात माझ्याविरोधात कोणताही ठोस पुरावा सापडलेला नाही. पण तरीदेखील याप्रकरणात माझं नाव गोवणं सुरुच राहील अशा शब्दात धोनीनं नाराजी व्यक्त केली. 

तिरंगी मालिकेत सोमवारी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना रंगणार आहे. या सामन्यापूर्वी आज कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं पत्रकार परिषद घेतली. यामध्ये धोनीनं पहिल्यांदाच आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणात मौन सोडलं. 

आयपीएल स्पॉट फिक्सिंगमध्ये मुदगल समितीनं दिलेल्या १३ खेळाडूंच्या यादीमध्ये महेंद्रसिंग धोनीचं नाव असल्याची चर्चा आहे. अद्याप ही यादी जाहीर झाली नाही. यापार्श्वभूमीवर धोनी म्हणाला, आयपीएल स्पॉट फिक्सिंगमध्ये माझ्याविरोधात कोणताही ठोस पुरावा सापडलेला नाही. पण भारतीय क्रिकेटचा विषय निघाल्यास त्यात माझं नाव येतच राहील. प्रत्येक गोष्टीत मला गोवलं जाईल. याची मला सवय झाली आहे असा टोला धोनीनं लगावला. मला अशा गोष्टींची सवय झाली असून दररोज नवनवीन कहाणी येतच राहील असं धोनीनं म्हटलं आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.