सावधान: ISISमध्ये सामील व्हायला गेलेली तरुणी परतली

तिनं बढाया मारून तिला इसिसकडे आकर्षित केलं. मग दोघी निघाल्या इसिस या दहशतवादी संघटनेत सामील व्हायला. दोघी तुर्कीपर्यंत पोहोचल्याही. नंतर तिचं मन पालटलं आणि हा बेत रद्द करून ती तुर्कीतूनच कतारला परतली. दोन महिन्यांपूर्वीची ही घटना उजेडात आली ती शनिवारी.

PTI | Updated: Feb 2, 2015, 04:05 PM IST
सावधान: ISISमध्ये सामील व्हायला गेलेली तरुणी परतली title=

हैदराबाद : तिनं बढाया मारून तिला इसिसकडे आकर्षित केलं. मग दोघी निघाल्या इसिस या दहशतवादी संघटनेत सामील व्हायला. दोघी तुर्कीपर्यंत पोहोचल्याही. नंतर तिचं मन पालटलं आणि हा बेत रद्द करून ती तुर्कीतूनच कतारला परतली. दोन महिन्यांपूर्वीची ही घटना उजेडात आली ती शनिवारी.

१९ वर्षांची ही मुलगी दोन महिन्यांपूर्वीच आई-वडिलांसोबत हैदराबादला परतली असून गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी तिची चौकशी केली. प्राथमिक चौकशीनुसार दहा वर्षांपूर्वी ती कुटुंबियांसोबत हैदराबादहून दोहा (कतार) इथं आली. ती कतारलाच राहायची. शेजारी राहणाऱ्या एका महिलेनं तिला इसिसची भुरळ घातली. इराक आणि सीरियावर कब्जा मिळविणाऱ्या इसिस या संघटनेत सामील होण्याच्या इराद्यानं दोघींनी तुर्की गाठली. मन पालटल्यानं तुर्कीहून ती कतारला आई-वडिलांकडे परतली. तेथून कुटुंबियांसोबत ती हैदराबादला परतली.

हैदराबादेत परतल्यानंतर तिची चौकशी करण्यात आली. तिला भरीस घालणारी तिची मैत्रीण तुर्कीची नागरिक असून सोशल नेटवर्किंग साईटच्या माध्यमातून दोघींची ओळख झाली.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.