सावधान! बँकिंग पासवर्ड चोरणारा व्हायरस सक्रिय

सायबर सुरक्षा अधिकाऱ्यांनी देशात ई-बँकिंग करणाऱ्या बँक ग्राहकांना सावधान केलंय. एक असा व्हायरस सक्रिय झालाय जो आपल्या ई-बँकिंग सेवेवर हल्ला करून आपली गोपनीय माहिती आणि पासवर्ड चोरतात. या व्हायरसला 'क्रायडेक्स' नाव दिलं गेलंय आणि हा एक धोकादायक ट्रोझनचा एक सदस्य आहे.

PTI | Updated: Feb 10, 2015, 09:25 PM IST
सावधान! बँकिंग पासवर्ड चोरणारा व्हायरस सक्रिय title=

नवी दिल्ली: सायबर सुरक्षा अधिकाऱ्यांनी देशात ई-बँकिंग करणाऱ्या बँक ग्राहकांना सावधान केलंय. एक असा व्हायरस सक्रिय झालाय जो आपल्या ई-बँकिंग सेवेवर हल्ला करून आपली गोपनीय माहिती आणि पासवर्ड चोरतात. या व्हायरसला 'क्रायडेक्स' नाव दिलं गेलंय आणि हा एक धोकादायक ट्रोझनचा एक सदस्य आहे.

कंप्युटर इमरजंसी रिस्पॉंस टीम ऑफ इंडिया (सीईआरटी-इन) नं ही माहिती दिलीय. यानुसार क्रायडेक्स मालेवअर जलदगतीनं पसरत असल्याचं निदर्शनास आलंय.

क्रायडेक्स सूचना चोरणारा ई-बँकिंग ट्रोझन आहे. जो विविध रिमुव्हेबल ड्राइव्हच्या माध्यमातून पसरतो आणि ऑनलाइन बँकिंग, सोशल मीडियावर निशाणा साधून ग्राहकांचे नावं आणि पासवर्ड चोरतो. विशेष म्हणजे सीईआरटी देशात हँकिंग-फिशिंग इत्यादींशी लढणारी नोडल एजंसी आहे. त्यांनी ही माहिती दिलीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.