वर्ल्डकप २०१५च्या सेमीफायनलमध्ये पोहोचणार भारत - सेहवाग

टीम इंडियातून बाहेर असलेला भारताचा धडाकेबाज बॅट्समन विरेंद्र सेहवागनं भारत वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये जागा मिळवेल, असा विश्वास दर्शवलाय. सेहवाग म्हणाला, नुकत्याच झालेल्या मॅचेसच्या रिझल्टचा चार वर्षांनंतर होणाऱ्या वर्ल्डकपवर विशेष परिणाम होणार नाही.

PTI | Updated: Feb 3, 2015, 11:36 AM IST
वर्ल्डकप २०१५च्या सेमीफायनलमध्ये पोहोचणार भारत - सेहवाग title=

नवी दिल्ली: टीम इंडियातून बाहेर असलेला भारताचा धडाकेबाज बॅट्समन विरेंद्र सेहवागनं भारत वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये जागा मिळवेल, असा विश्वास दर्शवलाय. सेहवाग म्हणाला, नुकत्याच झालेल्या मॅचेसच्या रिझल्टचा चार वर्षांनंतर होणाऱ्या वर्ल्डकपवर विशेष परिणाम होणार नाही.

विरू म्हणतो, मला पूर्ण विश्वास आहे की भारत सेमीफायनलमध्ये जागा मिळवेल आणि यासाठी त्या खास दिवशी कसं प्रदर्शन करणार त्यावर हे अवलंबून असेल. भारताविरुद्ध सेमीफायनलमध्ये कोणती टीम पोहोचली पाहिजे असं सेहवागला विचारलं असता, त्यानं भारताशिवाय ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझिलंड , असं उत्तर त्यानं दिलं. 

टीमच्या नुकत्याच झालेल्या मॅचेसचा परिणाम वर्ल्डकपवर होणार नाही, असं सेहवागचं मत आहे. २००३मध्ये पहिले न्युझीलंड सोबत ७ मॅचच्या सीरिजमध्ये भारताचा २-५ असा पराभव झाला होता. पण त्यानंतर झालेल्या वर्ल्डकपमध्ये टीम इंडियानं चांगलं प्रदर्शन केल्याचं तो म्हणतो. 

युवराज सिंहनं मागील वर्ल्डकपमध्ये पाचवा बॉलर म्हणून जे काही केलं होतं, ते खूप महत्त्वाचं होतं. आशा आहे की, यावेळी स्टुअर्ट बिन्नी आणि रविंद्र जडेजा असं करेल. सेहवाग म्हणतो, जर भारताच्या पारंपरिक विरोधी पाकिस्तान विरुद्धची पहिलीच मॅच भारतानं जिंकली तर त्यानं टीम इंडियावरचा दबाव कमी होईल.

सेहवाग पुढे म्हणाला, जर आपण पहिलीच मॅच जिंकलो तर दबाव कमी होतो. भारतीय खेळाडू नेहमीच या मॅचला महत्त्व देतात. फायनल पूर्वीची फायनल समजूनच भारत-पाकिस्तान मॅच खेळली जाते. सध्या निवडली गेलेली वर्ल्ड कप टीममध्ये सर्वच युवा खेळाडू चांगले आहेत. कोणत्याही एका खेळाडूला महत्त्वाचा एक्का म्हणणं कठीण आहे. पुढे सेहवाग म्हणाला, मी अजूनही खेळतोय आणि आणखी दोन वर्ष  कोणताही विचार न करता क्रिकेट खेळत राहणार आहे.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.