सत्यम घोटाळा : रामलिंग राजूला ७ वर्षांची शिक्षा, ५ कोटींचा दंड

सत्यम घोटाळा प्रकरणी बी. रामलिंग राजूसह इतर सर्व नऊ आरोपींना दोषी ठरविले आहे. या प्रकरणात रामलिंग राजूला ७ वर्षांची शिक्षा, ५ कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे

PTI | Updated: Apr 9, 2015, 04:28 PM IST
सत्यम घोटाळा : रामलिंग राजूला ७ वर्षांची शिक्षा, ५ कोटींचा दंड title=

हैदराबाद : सत्यम घोटाळा प्रकरणी बी. रामलिंग राजूसह इतर सर्व नऊ आरोपींना दोषी ठरविले आहे. या प्रकरणात रामलिंग राजूला ७ वर्षांची शिक्षा, ५ कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच अन्य दोषींनाही ७ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

देशात कॉर्पोरेट क्षेत्रातील सर्वात मोठा घोटाळा  आहे. या घोटाळ्यासंदर्भात हैदराबाद विशेष न्यायालयात खलटा सुरु आहे.  'सत्यम कॉम्प्युटर्स'चा संस्थापक बी. रामलिंग राजू याला न्यायालयाने दोषी ठरविले आहे. त्यामुळे काय शिक्षा होते याकडे लक्ष लागले होते.

न्यायालयाने बी रामलिंग राजूला फसवणूक, विश्वासघात, खोटी कागदपत्रे बनविणे आणि क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट, या गुन्ह्यांखाली दोषी ठरवले आहे. यापूर्वी दोनदा खटल्याची सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. सुमारे सहा वर्ष चाललेल्या प्रकरणात तीन हजार कागदपत्रे आणि २२६ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली होती.

या घोटाळ्याप्रकरणी बी. रामलिंगम राजूबरोबरच त्याचा भाऊ बी. रामा राजू , वदलमणी श्रीनिवास, माजी संचालक राम म्यान्मपती यांना ८ डिसेंबर रोजी सहा महिन्यांची कोठडी सुनावली होती.  केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) या प्रकरणाचा तपास केला आहे. 

हा गैरव्यवहार ७ हजार कोटी रुपयांचा असून त्यात गुंतवणूकदारांचे १४ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्या वेळी देशातील चौथ्या क्रमांकाची आयटी कंपनी असलेल्या 'सत्यम'चा संस्थापक रामलिंग राजू याने सेबीला ई-मेल पाठवून आपण कंपनीच्या जमा खात्यातील रकमेचा आकडा तसेच बँकांमधील ठेवींची रक्कम फुगवून सांगितल्याची कबुली ७ जानेवारी २ ००९रोजी दिली होती.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.