मलेशियन ओपन : सायना नेहवालचा उपांत्य फेरीत पराभव

जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेली भारताची अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवालला मलेशियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला. त्यामुळे ती स्पर्धेतून बाहेर पडली.

PTI | Updated: Apr 4, 2015, 06:06 PM IST
मलेशियन ओपन : सायना नेहवालचा उपांत्य फेरीत पराभव title=

क्वालालंपूर : जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेली भारताची अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवालला मलेशियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला. त्यामुळे ती स्पर्धेतून बाहेर पडली.

अग्रमानांकित चीनच्या ली झुएरुई हिने १३-२१, २१-१७, २२-२० असा पराभव केला. सायनाने उपांत्यपूर्व फेरीत चीनच्याच सून यू हिचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. 

सायनाने उपांत्य सामन्यात सुरुवातीला पहिल्या गेममध्ये पिछाडीवर गेली. पहिला गेम २१-१३ असा सहज जिंकला. मात्र, दुसऱ्या गेममध्ये सायनाला लीने कडवी लढत दिली. दुसऱ्या गेममध्ये ली ने सायनाला संधी न देता पिछाडीवर ठेवत दुसरा गेम जिंकून २१-१७ असा जिंकून सामन्यात चुरस निर्माण केली.

सुमारे एक तास सात मिनिटे या दोघींमध्ये लढत झाली. अखेर या लढतीत ली ने बाजी मारत अंतिम फेरी गाठली. ली अंतिम फेरीत स्पेनच्या कॅरोलीन मरीन हिच्याशी लढणार आहे. सायनाने कारकिर्दीत तिसऱ्यांदा या स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली होती.

पुरुष एकेरीत काल पी. कश्‍यप, के. श्रीकांत आणि एच. एस. प्रणॉय आणि महिला दुहेरीत ज्वाला गुट्टा-अश्‍विनी पोनप्पा यांचे आव्हान संपुष्टात आले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.