माउंट एव्हरेस्टच्या मार्गानं तिबेट ते नेपाळ रेल्वे ट्रॅक टाकणार चीन

चिनी ड्रॅगननं पुन्हा एकदा भारताच्या सुरक्षेला आव्हान दिलंय. तिबेटपासून थेट नेपाळपर्यंत रेल्वे मार्ग टाकण्याची घोषणाच चीन सरकारनं केली असून यात माऊंट एव्हरेस्टमधून भलामोठा बोगदा टाकण्याचा मानस व्यक्त केलाय.

PTI | Updated: Apr 10, 2015, 06:19 PM IST
माउंट एव्हरेस्टच्या मार्गानं तिबेट ते नेपाळ रेल्वे ट्रॅक टाकणार चीन title=

बीजिंग: चिनी ड्रॅगननं पुन्हा एकदा भारताच्या सुरक्षेला आव्हान दिलंय. तिबेटपासून थेट नेपाळपर्यंत रेल्वे मार्ग टाकण्याची घोषणाच चीन सरकारनं केली असून यात माऊंट एव्हरेस्टमधून भलामोठा बोगदा टाकण्याचा मानस व्यक्त केलाय.

चीनमधल्या सरकारी चायना डेली या वृत्तपत्रानं दिलेल्या बातमीनुसार किनघाई-तिबेट रेल्वे मार्गाचा नेपाळ सीमेपर्यंत विस्तार करण्यात येणार आहे. नेपाळ आणि चीनमध्ये व्यापार तसंच पर्यटन वाढवण्यासाठी हा प्रकल्प असल्याचा दावा चीननं केलाय. नेपाळ सरकारनं केलेल्या विनंतीनंतरच ही योजना आखल्याचा दावा चायना डेलीनं केलाय. 

हा प्रकल्प २०२०पर्यंत पूर्ण करण्याची चीनच्या रेल्वे मंत्रालयाची योजना आहे. मात्र भारताला छुपं आव्हान देण्याचा ड्रॅगनचा यामागचा हेतू स्पष्ट आहे. शेजाऱ्यांशी जवळीक करून भारताची कोंडी करण्याचा प्रयत्न चीन नेहमीच करत आलाय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.