मुंबई: अभिनेता सलमान खानवरील कायदेशीर प्रकरणं कमी होते की काय, म्हणून आणखी एका प्रकरणी त्याच्यावर एफआयआर दाखल करण्यात आलीय. सलमानचा बॉडीगार्ड आणि सलमानवर पोलिसांनी हल्ला, मारहाण आणि धमकाविण्याच्या आरोपात गुन्हा दाखल केलाय.
सलमान आणि त्याचा बॉडीगार्ड विशाल विरोधात भ्रष्टाचार विरोधी कार्यकर्ते रविंद्र द्विवेदी यांनी तक्रार केलीय.
त्यांचा आरोप आहे की, मागील वर्षी नोव्हेंबरला ४९ वर्षीय सलमान आणि त्याच्या बॉडीगार्डनं द्विवेदींनी मुंबई-दिल्ली फ्लाइटदरम्यान मारहाण आणि शिवीगाळ केली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.