अखेर रणबीरनं स्वीकारलं कतरिनासोबतचं नातं, पुढील वर्षी लग्न करणार

अनेक वर्षांपासून मीडियामध्ये असलेल्या चर्चेला अखेर अभिनेता रणबीर कपूरनं पूर्णविराम दिलाय. अखेर अभिनेत्री कतरिना कैफ सोबतचं आपलं नातं त्यानं स्वीकारलं असून पुढील वर्ष अखेरीस आपण विवाहबद्ध होणार असल्याचं त्यानं सांगितलंय.

PTI | Updated: May 11, 2015, 09:06 AM IST
अखेर रणबीरनं स्वीकारलं कतरिनासोबतचं नातं, पुढील वर्षी लग्न करणार title=

मुंबई: अनेक वर्षांपासून मीडियामध्ये असलेल्या चर्चेला अखेर अभिनेता रणबीर कपूरनं पूर्णविराम दिलाय. अखेर अभिनेत्री कतरिना कैफ सोबतचं आपलं नातं त्यानं स्वीकारलं असून पुढील वर्ष अखेरीस आपण विवाहबद्ध होणार असल्याचं त्यानं सांगितलंय.

एरवी आपल्या खाजगी आयुष्याबद्दल आणि कतरिनासोबतच्या नात्याबद्दल रणबीर बोलणं टाळतो. पण एका इंटरव्ह्यू दरम्यान रणबीर हे कबुल केलंय. कतरिना आणि रणबीरला अनेक वेळा आपण सोबत पाहतो. 

रणबीस म्हणाला, 'यावर्षी आम्ही खूप बिझी आहोत, अशात लग्नासाठी वेळ नाहीय. आम्ही पुढल्या वर्षाच्या अखेरीस लग्न करण्याचा विचार करतोय. आम्हां दोघांचंही यावर एकमत आहे. ' तो म्हणतो, 'आम्हाला आमच्या नात्यावर विश्वास आहे. जर आता आम्ही आपल्या नात्याबद्दल जाहीर खुलासा केला नाही तर तो नात्याचा अपमान असेल. मी ३३ वर्षांचा आहे आणि ही वेळ संसारात पडण्याची आहे. कतरिनालाही हेच हवंय. मी लहानाचा मोठा अशा कुटुंबात झालोय की जिथं चित्रपटच सर्वकाही आहे. अशात मी गॉसिपचं महत्त्व समजतो आणि माझा फंडा सिंपल आहे. जिथं गॉसिप आहे तिथं कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाही आणि हा सल्ला आहे स्वत:बद्दल जास्त विचार करू नये.' 

रणबीर आणि कतरिना यांचा एकत्रपणे पहिला चित्रपट २००९मध्ये आला 'अजब प्रेम की गजब कहानी'. रणबीरचं पहिले दीपिका पदुकोणसोबत तर कतरिनाचं पहिले सलमान खान सोबत अफेअर होतं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.