गॉगलघालून पंतप्रधानांचं स्वागत करणाऱ्या कलेक्टरला सरकारची नोटीस

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागतादरम्यान गॉगल घातल्यानं छत्तीसगडच्या बस्तरचे कलेक्टर अमित कटारिया यांना सामान्य प्रशासन विभागानं नोटीस बजावलीय. त्यांच्यासह दंतेवाडाचे जिल्हाधिकारी के. सी. देवसेनापती यांनाही पांढरा शर्ट आणि ट्राऊझर घातल्यामुळं नोटीस बजावण्यात आलीय. 

PTI | Updated: May 15, 2015, 06:12 PM IST
गॉगलघालून पंतप्रधानांचं स्वागत करणाऱ्या कलेक्टरला सरकारची नोटीस title=

रायपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागतादरम्यान गॉगल घातल्यानं छत्तीसगडच्या बस्तरचे कलेक्टर अमित कटारिया यांना सामान्य प्रशासन विभागानं नोटीस बजावलीय. त्यांच्यासह दंतेवाडाचे जिल्हाधिकारी के. सी. देवसेनापती यांनाही पांढरा शर्ट आणि ट्राऊझर घातल्यामुळं नोटीस बजावण्यात आलीय. 

राजशिष्टाचाराचं उल्लंघन झाल्याचं कारण या नोटीशीत देण्यात आलंय. मोदी बस्तरमध्ये आले असता त्यांच्या स्वागतासाठी दोन्ही जिल्हाधिकारी राज्याचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यामुळं त्यांनी राजशिष्टाचाराचं पालन करणं बंधनकारक असल्याचं नमूद करण्यात आलंय. 

काँग्रेसनं मात्र सरकारच्या या कारवाईवर टीका केलीय. तर मुख्यमंत्र्यांनी या नोटीशीचं समर्थन केलंय. राजशिष्टाचार पाळायलाच हवा असं त्यांनी नमूद केलंय. कटारीया हे २००४च्या बॅचचे आएएस अधिकारी आहेत. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.