गायक अभिजीत, फराहावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

अभिनेता सलमान खानच्या सुटकेवर वादग्रस्त ट्विट करणा गायक अभिजीत भट्टाचार्य आणि फराह अली खान यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना आता चांगलेच महागात पडले आहे. 

PTI | Updated: May 9, 2015, 12:30 PM IST
गायक अभिजीत, फराहावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश title=

मुझफ्फरपूर : अभिनेता सलमान खानच्या सुटकेवर वादग्रस्त ट्विट करणा गायक अभिजीत भट्टाचार्य आणि फराह अली खान यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना आता चांगलेच महागात पडले आहे. 

तेढ पसरवणे, चिथावणीखोर विधान केल्याप्रकरणी या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश बिहारमधील कोर्टाने दिले आहेत.  अभिनेता सलमान खान याला हिट अँड रनप्रकरणी तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्यावर गायक अभिजीत यांनी सलमानच्या समर्थनार्थ वादग्रस्त व संताप आणणारे ट्विट केले होते.  कुत्रे रस्त्यावर झोपले तर ते मरणारच. रस्ते हे गरिबांच्या बापाचे नाहीत. माझ्याकडेही घर नव्हते, म्हणून मी कधी रस्त्यावर झोपलो नाही, असे त्याने म्हटले होते. 

सलमानची मैत्रिण फराह अली खानने देखील रस्त्यावर झोपणाऱ्या गरिबांना सुविधा न देणारे सरकार जबाबदार असून सलमानचा यात काही  दोष नाही, असे अकलेचे तारे तोडले होते. या दोघांविरोधात बिहारमधील वकिल सुधीर ओझा यांनी मुझफ्फरनगरमधील कोर्टात याचिका दाखल केली होती.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.