कोकणात भरती... जळगावात पावसाचे आकडे वरती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवबागमधल्या माडबागायतीसह सुमारे १० घरांना आजच्या हायटाईडचा फटका बसलाय. समुद्राचं पाणी थेट घरांमध्ये घुसलंय.
Jul 24, 2013, 06:44 PM ISTकोकणात पावसाचा दणका, पूर परिस्थिती कायम
कोकणात पावसाने धुमाकूळ घातलाय. अनेक ठिकाणी पुराचे पाणी भरले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून गेल्या दोन दिवसामंपासुन असलेली पूरस्थिती आजही कायम, चिपळूण, खेड, माखजण या बाजारपेठा पाण्याखाली असून संगमेश्वरलाही पुराचा धोका निर्माण झालाय.
Jul 24, 2013, 02:09 PM ISTकोकणात धुव्वाधार, रेल्वे वाहतूक विस्कळीत
कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस कोसळत आहे. दोन्ही जिल्ह्यातील प्रमुख नद्यांनी धोक्याची पातळी गाठली आहे. रत्नागिरीत खेड,चिपळूण, राजापूर आणि संगमेश्वर येथील नद्यांना पूर आलायं कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालीय.
Jul 23, 2013, 04:21 PM ISTकोकणात अतिवृष्टीचा इशारा
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळतोयं. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. येत्या २४ तासात अतिवृष्टीचा धोका असल्याचा इशारा वेधशाळेने दिलाय.
Jul 23, 2013, 10:49 AM ISTकोकणात वर्षा पर्यटनाची धूम!
कोकणात सध्या वर्षा पर्यटनाची धूम सुरू झालीय... धो धो पावसामुळे धबधबे वाहू लागले असून, धबधब्यांमध्ये चिंब भिजताना आणि पार्ट्या झोडताना पर्यटकांना आनंदही ओसंडून वाहतोय.
Jul 21, 2013, 06:53 PM ISTमुंबईसह उपनगरांत पावसाचा जोर, रेल्वे सुरळीत
मध्यरात्रीपासून मुंबईसह उपनगरांत पावसाचा जोर वाढलाय. ठाण्यातही मुसळधार पाऊस सुरू आहे.. मात्र या पावसाचा रेल्वे आणि रस्ते वहातुकीवर अजुनतरी कोणताही परिणाम झालेला नाही. मात्र पाऊस असाच सुरू राहील्यास रेल्वे आणि रस्ते वाहतुकीला याचा फटका बसू शकतो.
Jul 20, 2013, 08:56 AM ISTराज्यात संततधार, कोकण-कोल्हापुरात पूर
राज्यात जोरदार हजेरी लावली आहे. कोकण, कोल्हापुरात नद्यांना पूर आलाय. संततधार पावसाचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
Jul 12, 2013, 11:41 AM ISTमुंबईसह राज्यात संततधार, रेल्वेवर परिणाम
मुंबईसह राज्यात जोरदार हजेरी लावली आहे. संततधार पावसाचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मध्य रेल्वेची वाहतूक धिम्मा गतीने सुरू आहे. ठाणे, कल्याणमध्ये जोरदार पाऊस असून ठाण्यात रूळावर पाणी साचल्याने गाड्या सुटण्यास १५ मिनिटे उशीर होत आहे. तर मुंबई-पुणे एक्स्प्रेस गाड्यांनाही उशीर झालाय. तर राज्यात कोकण, कोल्हापुरात नद्यांना पूर आलाय.
Jul 12, 2013, 11:17 AM ISTकोकणात पूरस्थिती, विद्यार्थी गेला वाहून
कोकणात जोरदार वृष्टी होत असल्याने अनेक नद्यांना पूर आलाय. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. चिपळूण, संगमेश्वर, राजापूर येथे नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेय. तर पोलादपूर येथे १३ वर्षीय शालेय विद्यार्थी वाहून गेला.
Jul 3, 2013, 04:10 PM ISTकोकणात मुसळधार, रेल्वे-रस्ता वाहतुकीवर परिणाम
गेल्या दोन दिवसांपासून कोकणात मुसळधार पाऊस होत आहे. याचा परिणाम मुंबई-गोवा रस्ता वाहतूक आणि कोकण रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. संगमेश्वर तालुक्यातील आरवली येथे दरड कोसळ्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. दरम्यान, कोकण रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी हेल्पलाईन सेवा सुरू केलेय.
Jul 3, 2013, 08:30 AM ISTपावसाने मुंबई जलमय, रेल्वेसेवा कोडमडली
मुंबईमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. मध्य आणि दक्षिण मुंबईत सुरु असलेल्या पावसाने मध्य रेल्वेची सेवा ठप्प झालीय. एलफिस्टन, परळ, दादर, हिंदमाता या सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली असून रस्त्यावरील वाहतूकही विस्कळीत झालीय. परळमध्ये घरं आणि दुकानातही पाणी शिरले असून या पावसानं महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाचा बोजावरा उडालाय.
Jun 16, 2013, 01:53 PM ISTमुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस
आठवड्याभराची विश्रांती घेऊन वीकेंडला हजेरी लावलेल्या पावसाचा जोर संडेलाही कायम आहे. शनिवारपासून मुंबईत पावसाची रिपरिप सुरु आहे. तर ठाण्यातही मुसळधार पाऊस सुरु आहे. संततधार पावसामुळं सखल भागात पाणी साचलंय.
Jun 16, 2013, 09:01 AM ISTकोकणात मुसळधार... खान्देशात संततधार
रत्नागिरीला मुसळधार पावसाने झोडपलंय. खेडमध्ये नारंगी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झालीय. यामुळे खेड-सुसेरी रस्ता पाण्याखाली गेलाय. तर दापोली-बोंडिवली रस्ताही पाण्याखाली गेलाय.
Jun 15, 2013, 09:41 PM ISTकोकणात मुसळधार पाऊस, वादळी नुकसान
मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर नैर्ऋत्य मोसमी वारे कोकणसह मुंबईमध्ये शनिवारी दाखल झाले. आतापर्यंत मान्सूनने राज्यातील कोकण, मराठवाडा, मध्य, उत्तर महाराष्ट्र व्यापला आहे. कोकणात सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगडमध्ये चांगला पाऊस कोसळत आहे. येत्या ४८ तासांमध्ये जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
Jun 9, 2013, 10:22 AM ISTव्होल्वो कोकणासाठी, अडकल्या मुंबईच्या आगारी!
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळानं कोकण टुरिझमसाठी घेतलेल्या सव्वा सहा कोटी रुपये किंमतीच्या पाच व्होल्वो बसेस बेस्टच्या आणिक बस आगारात धूळ खात पडून आहेत. जनतेचा पैसा पाण्यात कसा घालवला जातो. त्याचे हे एक उदाहरण.
May 23, 2013, 07:10 PM IST