www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. मध्य आणि दक्षिण मुंबईत सुरु असलेल्या पावसाने मध्य रेल्वेची सेवा ठप्प झालीय. एलफिस्टन, परळ, दादर, हिंदमाता या सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली असून रस्त्यावरील वाहतूकही विस्कळीत झालीय. परळमध्ये घरं आणि दुकानातही पाणी शिरले असून या पावसानं महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाचा बोजावरा उडालाय.
आठवड्याभराची विश्रांती घेऊन वीकेंडला हजेरी लावलेल्या पावसाचा जोर संडेलाही कायम आहे... शनिवारपासून मुंबईत पावसाची रिपरिप सुरु आहे.. तर ठाण्यातही मुसळधार पाऊस सुरु आहे.. संततधार पावसामुळं सखल भागात पाणी साचलंय.. तर कल्याण डोंबिवलीतही पाऊस धोधो बरसतोय... धरणक्षेत्रातही दमदार पाऊस सुरु आहे.... पावसामुळं मध्य रेल्वेची वाहतूक सध्या बंद झालीय.
सुपरसंडेला पावसानं जोरदार हजेरी लावलीय... शनिवारपासून पावसाची ठिकठिकाणी संततधार सुरु होती.. मात्र रविवारी सकाळपासून पाऊस धो-धो बरसण्यास सुरुवात झालीय... या पावसामुळं ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झालीय... हिंदमाता, परेल, मस्जिद बंदर, घाटकोपर, अंधेरी या ठिकाणी पाणी साचलंय... गुडघाभर पाण्यातून चालण्याची वेळ मुंबईकरांवर आलीय...बेस्टच्या बसमध्येही पाणी शिरलंय... त्यामुळं सुट्टीचा रविवार एन्जॉय करण्यासाठी बाहेर पडलेल्या मुंबईकरांचे या पावसामुळं हाल होतायत...
पुण्यातही पावसाने दमदार हजेरी लावलीय.. संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय... त्यातच सुट्टीचा रविवार असल्याने वाहतूक आणि दैनंदिन व्यवहार ठप्प झालेत... दुसरीकडे पुणेकरांसाठी आनंदाची बातमी म्हणजे पाणीपुरवठा करणा-या धरणपरिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे... गेल्या 24 तासांत धरणक्षेत्रात 125 मिमी पावसाची नोंद झालीय..
खान्देशात पावसाची संततधार सुरुच आहे.
गेल्या 36 तासांहून अधिका कालावधीपासून सुरु असलेल्या पावसामुळं नदीनाले दुथडी भरुन वाहू लागलेत.. धरणांमधील पाणीसाठाही वाढलाय.. तापी नदीवरील हतनूर धरणाच्या लाभक्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने 41 पैकी 36 दरवाजे उघडण्यात आलेत... धरणातून 2060 क्युसेक्स प्रतिसेकंद एवढा पाण्याचा विसर्ग सुरु आहे.. त्यामुळं प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय.
जळगावला पाणीपुरवठा करणा-या वाघुर धरणाची पाणीपातळीही रात्रीतून दोन फुटांनी वाढली असून शहरात आता पुन्हा दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे.. जळगावसह अमळनेर, धरणगाव, चोपडा, पारोळा तालुक्यात मान्सूनचा पाऊस बरसतोय... आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर पावसानं कमबॅक केल्यानं बळीराजा सुखावलाय.
पुण्यातही जोरदार पाऊस सुरु आहे... लोणावळ्यात गेल्या २४ तासांत मुसळधार पाऊस सुरु असून तब्बल ३०० मि.मी.पावसाची नोंद करण्यात आलीय.. शनिवारपासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे शहरातील ५० टक्के रस्ते पाण्याखाली गेल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय.. मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवे तसंच राष्ट्रीय महामार्ग क्र.4 वरील वाहतूकही या पावसामुळे थंडावलीय.. मुसळधार पावसामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने एक स्कॉरपीयो गाडी चालकाचा ताबा सुटून रस्त्यातच पलटी झाल्याची घटनाही येथे घडली आहे.
खंडाळा घाटामध्ये मंकी हिल येथे रेल्वेलाईन वर एक दगड पडल्यामुळे रेल्वे सेवाही काही काळ विस्कळीत झाली होती. लोणावळयात पावसाळी पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांनीही या मुसळधार पावसामुळे हॉटेलच्या बाहेर पडण्यापेक्षा आतच बसणे पसंत केले. लोणावळयातील पर्यटकांची पंढरी समजला जाणरा भुशी डॅमही ओव्हरल्फो झाला असून शहरातील तुंगार्ली धरण, लोणावळा धरण, वलवण धरण या धरणाच्या पाणीसाठयातही मोठी वाढ झाली आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.