www.24taas.com, झी मीडिया, सिंधुदुर्ग
कोकणात सध्या वर्षा पर्यटनाची धूम सुरू झालीय... धो धो पावसामुळे धबधबे वाहू लागले असून, धबधब्यांमध्ये चिंब भिजताना आणि पार्ट्या झोडताना पर्यटकांना आनंदही ओसंडून वाहतोय. शनिवार-रविवारच्या वीकेन्डला तर मोठी गर्दी पाहायला मिळतेय.
कोकण आणि पर्यटन यांचं घट्ट नातं आहे. पूर्वी कोकणात उन्हाली पर्यटन तेजीत असायचं, आता त्यात पावसाळी पर्यटनाची भर पडलीय. कोकण म्हटलं की, डोळ्यासमोर येतात ते खळाळून वाहणारे धबधबे आणि हिरवेगार वातावरण. कोकणात सध्या मुसळधार पाऊस पडतोय. त्यामुळं वर्षा पर्यटनालाही बहार आलीय. मनसोक्त भिजायला येणारे पर्यटक अगदी जेवणाचा बेत करूनच इथं येतायत. धबधब्याशेजारच मटण आणि चिकन बनवून त्यावर यथेच्छ ताव मारला जातोय. सिंधुदुर्गातील आंबोली, कासारटाका, सावडाव, मांगेली इथं सध्या पर्यटकांची गर्दी पाहायला मिळतेय. कासारटाका इथं तर हजारो पर्यटक गर्दी करतायत.
कोकणातलं बेधुंद वातावरण सध्या अनेकांना मोहित करतंय. कर्नाटक, गोवा इथूनही पर्यटक सध्या वीकेन्डसाठी कोकणात दाखल होतायत. चला तर मग तुम्हीही, कोकणचं हे निसर्ग सौंदर्य न्याहाळायला...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.