www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईसह राज्यात जोरदार हजेरी लावली आहे. संततधार पावसाचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मध्य रेल्वेची वाहतूक धिम्मा गतीने सुरू आहे. ठाणे, कल्याणमध्ये जोरदार पाऊस असून ठाण्यात रूळावर पाणी साचल्याने गाड्या सुटण्यास १५ मिनिटे उशीर होत आहे. तर मुंबई-पुणे एक्स्प्रेस गाड्यांनाही उशीर झालाय. तर राज्यात कोकण, कोल्हापुरात नद्यांना पूर आलाय.
मुंबई, ठाणे आणि कल्याणमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीला बसला आहे. ठाणे येथे रूळावर पाणी साचल्याने १५ ते २० मिनिटे गाड्या उशिराने धावत आहे. गाड्या लेट असल्याने चाकरमान्यांचे हाल झाले आहेत. त्यामुळे याचा ताण रस्ता वाहतुकीवर आलाय. पावसामुळे रस्ता वाहतुकीला अडथळा येत असल्याने रस्त्यावर ट्राफिक जामचा सामना करावा लागत आहे.
मुंबईसह ठाणे जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु असून अनेक सखल भागात पाणी साचले आहे. ठाणे, मुंब्रा, दिवा रेल्वे स्थानकातील रुळांवर पाणी साचल्याने मध्य रेल्वेची वाहतूक अर्धा तास उशीराने सुरु आहे.
पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय गाड्या १५ ते २० मिनिटे उशीराने धावत आहेत. गुजरातमधील वलसाड रेल्वे स्थानकात पाणी साचल्याने गुजरात- मुंबई रेल्वे वाहतूक विस्कळीत आहे. मुंबईत गेल्या २४ तासांपासून सुरू असलेला मुसळधार पाऊस आणखी ३६ तास कायम राहणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली.
मुंबई शहर आणि उपनगरात गुरुवार सकाळपासून संततधार पाऊस कोसळत आहे. यामुळे शहराच्या सखल भागात पाणी साचले आहे. त्यामुळे वाहनांची वाहतूक संथ गतीने सुरू आहे. तसेच रेल्वेची वाहतूक २० ते ३० मिनिटे उशिराने सुरू आहे.
दोन दिवसांत नवी मुंबईत पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी जून-जुलै या महिन्यांत पावसाचे प्रमाण अधिक आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.