www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मध्यरात्रीपासून मुंबईसह उपनगरांत पावसाचा जोर वाढलाय. ठाण्यातही मुसळधार पाऊस सुरू आहे.. मात्र या पावसाचा रेल्वे आणि रस्ते वहातुकीवर अजुनतरी कोणताही परिणाम झालेला नाही. मात्र पाऊस असाच सुरू राहील्यास रेल्वे आणि रस्ते वाहतुकीला याचा फटका बसू शकतो.
मुंबईसह ठाणे, डोंबिवली, नवी मुंबई या ठिकाणी जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचण्यास सुरूवात झालेय. या पावसाचा रेल्वेवर परिणाम झालेला नाही. लोकल सुरळीत सुरू आहे. मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर खड्डे पडलेत. त्यामुळे रस्त्यावर पाणी साचल्याने त्याचा त्रास पादचाऱ्यांना सहन करावा लागत आहे.
ठाण्यातील बारवी धरण ओव्हर फ्लो झाले आहे. जुलै महिन्यात गेल्या १० वर्षांमध्ये प्रथमच हे धरण पूर्णपणे भरले आहे. ठाण्यात चांगला पाऊस कोसळत आहे. तर कोकणातील खेड येतील जगबुडी आणि नारिंगी नदीला पूर आलाय. खेड, दापोलीमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे.
एक्स्प्रेस गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले
केवळ चंद्रपूर नाही तर संपूर्ण विदर्भात पावसाचा जोर कायम आहे. नागपुरमध्ये शुक्रवार पासून दमदार पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसाचा फटका रेल्वेसेवेलाही बसलाय. पावसामुळे तुळजापूर येथे रेल्वेरूळाखालील माती, खडी वाहून गेलीय. त्यामुळे नागपुरात रेल्वेच्या चारही मार्गावरील वहातूक ठप्प झालीये.
काही गाड्या दुस-या मार्गाने वळवण्यात आल्यात तर काही गाड्या रद्द करण्यात आल्यात यात मुंबई-नागपूर दुरान्तो एक्प्रेस, सेवाग्राम एक्प्रेस आणि राजधानी एक्प्रेस या गाड्यांचा समावेश आहे. अचानक गाड्या रद्द झाल्याने प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत. एक्स्प्रेस गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे. ७४ गाड्या अन्य मार्गाने वळविण्यात आल्या आहेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.