मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात
मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात झाला. एसटी बस आणि इंडिका गाडीत जोरदार धडक झाली. या अपघातात इंडिका कारमधील पाच जण जागीच ठार झालेत.
Jan 22, 2012, 01:31 PM ISTपुण्यामध्ये कानडी आंबे !
पुण्याच्या छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात कर्नाटकच्या हापूस आंब्याची आवक झाली आहे. हंगामापूर्वी दोन महिने आधीच या हापूसचं आगमन झाल्यानं तो कुतुहलाचा विषय ठरला आहे.
Jan 11, 2012, 11:58 PM ISTथंडीची लाट, फळांची वाट!
आंबाप्रेमींसाठी एक वाईट बातमी आहे. सध्या राज्यभर पसरलेल्या थंडीच्या लाटेमुळं आंब्याचं उत्पादन लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
Jan 11, 2012, 05:11 PM ISTकोकणात प्रचाराचं रणशिंग
रत्नागिरी नगर परिषदेत एकहाती सत्ता मिळवल्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारालाही शिवसेनेनं रत्नागिरीतून सुरूवात केली आहे. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पामुळे चर्चेत आलेल्या नाटेगावातून शिवसेना नेते रामदास कदम यांनी प्रचाराचं रणशिंग फुंकलं.
Jan 4, 2012, 02:32 PM ISTथर्टीफर्स्टचे वेध, कोकण फु्ल्ल
कोकणाच्या पर्यटनाला आता नाताळ आणि थर्टीफर्स्टचे वेध लागले आहेत.गोव्याबरोबरच विदेशी पर्यटकांनी यावर्षी कोकणाला पसंती दिली आहे. रत्नागिरी आणि सिधुदूर्ग मिळून सुमारे तीन लाख पर्यटक कोकणात येत असून एम.टी.डी.सी.सह खासगी रिसॉर्टची आरक्षणं फूल झाली आहेत.
Dec 31, 2011, 08:45 AM ISTयेवा कोकण आपलाच असा
दरवर्षी नाताळ आणि थर्टीफर्स्टचा मुहूर्त साधत लाखो पर्यटक गोव्याकडे धाव घेत असतात. यामधे विदेशी पर्यटकांची संख्या अधिक असते. मात्र यंदा पर्यटकांचा ट्रेंड काहीसा बदलला आहे. विदेशी पर्यटक नाताळनिमित्त आत्तापासूनच कोकणात दाखल झाले आहेत.
Dec 22, 2011, 04:36 AM ISTदर्याच्या राजाला मिळणार दिलासा
आता राज्यातील मच्छीमार बांधवांसाठी आनंदाची बातमी असणार आहे. राज्याच्या सागरी किनारपट्टीवरील मच्छीमारांच्या घरांच्या तसंच वहिवाटीच्या जमिनी आता लवकरच त्यांच्या नावावर होणार आहेत.
Dec 9, 2011, 11:39 AM ISTराष्ट्रवादीची नवी भूमिका गुंडगिरी नको
गुंडगुरी करणारे लोक राजकारणात नको ही राष्ट्रवादीची भूमिका आहे. ज्या पक्षात असे लोक असतील त्यांचा जनतेनं खुशाल पराभव करावा असं आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड यांनी केलयं.
Dec 8, 2011, 06:47 AM ISTराणेंचा गृहमंत्रालयावर हल्लाबोल
भास्कर जाधव यांच्या चिपळूणमधील कार्यालवरच्या हल्ल्याप्रकरणी खा. नीलेश राणे यांना नाहक गोवण्यात येतयं, असा आरोप नारायण राणे यांनी केलाय.
Nov 10, 2011, 05:06 AM ISTराणे-जाधव वादाचं लोण मलवणमध्येही !
मालवणमध्ये राणे पिता-पुत्रांच्या पुतळ्याचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दहन केलं, तर, आता खवळलेले काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. मालवणमध्ये राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुधीर मांजरेकर यांच्या घरावर राणे समर्थकांनी दगडफेक केली.
Nov 8, 2011, 12:55 PM IST