कोकण

मी माझ्या निर्णयावर ठाम - राणे

 मी जो काही निर्णय घेतला आहे. त्याच्यावर ठाम आहे, असे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी स्पष्ट केले आहे. राणे सोमवारी राजीनामा देणार हे आता स्पष्टच झाले आहे.

Jul 18, 2014, 09:02 AM IST

नारायण राणे नाराज, बंडाच्या पावित्र्यात

 काँग्रेसमध्ये अस्वस्थ असलेले उद्योगमंत्री नारायण राणे बंडाच्या पवित्र्यात असल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. उद्यापासून राणेंचा ३ दिवसांचा कोकण दौरा सुरू होत आहे. 

Jul 17, 2014, 01:29 PM IST

कोकणात अतिवृष्टी, राजापुरात एक बळी

 रत्नागिरी जिल्ह्यात येत्या ७२ तासात वादळी वा-यासह मुसळधार पावसाचा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला होता. सोमवारी संध्याकाळपासून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावलीय. वादळी वाऱ्यांसह कोसळलेल्या पावसामुळे दोन्ही जिल्ह्यातील जनजीवन पूर्णत: विस्कळीत झालंय. राजापुरात पावसाचा एक बळी गेलाय.

Jul 15, 2014, 12:53 PM IST

कोकणात पाचव्या दिवशाही मुसळधार

रत्नागिरीत सलग पाचव्या दिवशीही पावसानं दमदार हजेरी लावलीय. यामुळे शेतकऱ्यांनी आनंद आणि समाधान व्यक्त केलं आहे.

Jul 14, 2014, 12:14 AM IST

मुंबई, कोकणासह मराठवाडयात पाऊस

आषाढी एकादशीच्या मुहुर्तावर राज्याच्या अनेक भागात पावसाची जोरदार हजेरी, मुंबई, ठाणे, कोकणासह मराठवाडयात वरूण राजा बरसला.

Jul 9, 2014, 07:56 AM IST

रिझर्व्हेशन सुरू होताच हाऊसफुल्ल, दलालांचा फटका

कोकणात गणपतीसाठी जाणाऱ्या गणेशभक्तांसमोर दलालांचं विघ्न दूर करण्याचं आव्हान आहे. काल या गाड्यांसाठी आरक्षण सुरु झालं आणि अवघ्या काही मिनिटातचं हाऊसफुल्ल झालं. त्यामुळं रात्रभर तिकीटांसाठी रांगेत उभ्या असणाऱ्या प्रवाशांची निराशा झाली. या प्रकरणाची तातडीनं चौकशी करण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांच्याकडे केलीय.

Jun 30, 2014, 08:41 AM IST

कोकणात दुबार पेरणीचे संकट

 पावसाने संपूर्ण राज्यात दडी मारलीय. कोकणात जूनच्या सुरूवातीला थोडासा पाऊस झाला. त्यामुळे शेतक-यांनी भातशेतीच्या पेरण्या केल्या ख-या पण आता पावसाची चिन्ह नाहीत. त्यामुळे दुबार पेरणीचं संकट उभं राहीलंय. त्यातच धरणाच केवळ 32.47 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. हा साठा 2 महिने पुरेल इतकाच आहे. त्यामुळे कोकणात पाणीसंकट उभं राहीलंय.

Jun 26, 2014, 11:45 PM IST

मुंबईसह कोकणात समुद्राला उधाण, भरतीचे पाणी रस्त्यावर

मुंबईसह कोकण किणारपट्टीवर आज समुद्राला उधाण आले. समुद्राच्या उंच लाटाने दादर, वरळी या ठिकाणी पाणी रस्त्यावर आले. त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली. तर रत्नागिरी आणि सिंधुुदुर्गात भरतीचा तडाखा बसला.

Jun 12, 2014, 01:34 PM IST

कोकणात मान्सून`इलो रे बा इलो`

कोकणात मृग नक्षत्राच्या पावसाने सलामी दिली आहे. दक्षिण कोकण आणि गोव्यात मान्सूनचं आगमन झालं आहे.

Jun 11, 2014, 05:43 PM IST