शिवसेनेत धुसफूस सुरू, मेळावा पोस्टरवरून रामदास कदम गायब
गुहागर शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. इथं शिवसेना नेते रामदास कदम आणि खासदार अनंत गीते समर्थकांमध्ये धुसफूस सुरु आहे.
Oct 18, 2013, 01:39 PM ISTपावसाचा कोकण-बुलडाणा जिल्ह्याला तडाखा, एकाचा बळी
परतीच्या पावसाने राज्यात धुमाकूळ घातला आहे. रत्नगिरी जिल्ह्यीतील खेड तालुक्यात या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे पावसाने बुलडाणा जिल्ह्यात हाहाकार माजवला आहे.
Oct 5, 2013, 01:22 PM ISTखराब रस्त्यांमुळे कोकणातला पर्यटनव्यवसाय धोक्यात
चांगले रस्ते हे विकसित देशाची निशाणी मानली जाते. पर्यटनस्थळासाठीही हेच तत्व लागू आहे. पर्यटनस्थळी पर्यटकांचा ओघ वाढण्यासाठी रस्ते चांगले असणं ही मुलभूत गरज आहे. मात्र कोकणात नेमकं याच्या उलट घडतंय.
Sep 27, 2013, 07:03 PM ISTउद्योगमंत्री राणेंविरोधात गावकऱ्यांबरोबर विरोधकही मैदानात
रत्नागिरीतल्या जैतापूर प्रकल्पाच्या संघर्षाची धार कमी होते न होते तोच आता आता कोकणात सी वर्ल्ड प्रकल्पावरून नवा वाद निर्माण झाला आहे. उद्योगमंत्री नारायण राणे यांच्याविरोधात आता गावकरी एकत्र आले आहेत.
Sep 18, 2013, 11:16 AM ISTकोकणात जाणाऱ्यांच्या गर्दीनं महामार्ग फुलला
गणपतीसाठी कोकणात जाण्याऱ्या वाहनांना गर्दी झाल्याचं चित्र आज सायन-पनवेल मार्गावर पाहायला मिळालं. कोकणात जाणाऱ्या गाड्यांना शनिवारपासूनच ही गर्दी दिसून येत आहे. त्यामुळं वाहनांच्या रांगा लागल्या असून वाहतूक धिम्यागतीनं सुरू आहे.
Sep 9, 2013, 04:27 PM ISTचला गणपती गावाकडं चला...
गणेशोत्सव आणि चाकरमानी यांच्यामध्ये एक अतूट असं नातं आहे. गणेशोत्सव साजरा करण्यासाठी लाखोंच्या संख्येनं चाकरमानी कोकणात दाखल होत असतात. दरवर्षीप्रमाणं यंदाही मोठ्या संख्येनं चाकरमानी कोकणात दाखल होत असल्यानं कोकण गजबजून गेलाय.
Sep 8, 2013, 11:15 AM ISTकोकणात जाण्यासाठी आणखी जादा रेल्वे, एसटी
गणेशोत्सवात कोकणमध्ये जाण्यासाठी एसटी आणि रेल्वेचे आरक्षण फुल्ल झाले आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने कोकणात जाण्यासाठी आणखी जादा रेल्वे सोडल्या आहेत. तसेच मुंबईबाहेर जाणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने आणखी सहा जादा फेऱ्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. एसटी महामंडळ १८०० जादा बसेस सोडणार आहे.
Aug 29, 2013, 12:11 PM ISTसण आयलाय गो...नारळी पूनवेचा!
सण आयलाय गो नारळी पूनवेचा... असं म्हणत कोकणात सध्या नारळी पौर्णिमेची लगबग सुरु आहे. नारळी पौर्णिमेला नारळ समुद्राला अर्पण केल्यानंतर मासेमारीला सुरुवात होते.
Aug 19, 2013, 06:10 PM ISTकोकणासाठी विशेष ट्रेन्स धावणार
कोकणातील चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ९ ऑगस्ट आणि १५ ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक टर्मिनसवरून मडगावला जाणाऱ्या विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत.
Aug 6, 2013, 11:30 PM ISTविदर्भ-कोकणात पूर परिस्थिती
चंद्रपूर जिल्ह्यात पुराची परिस्थिती कायम आहे. मात्र या पुरपरिस्थितीला पाऊस कारणीभूत नाही. वर्धा , पैनगंगा आणि वैनगंगा या नद्यांना आलेला पूर आणि त्यांच्या दबावामुळे इरई नदीचं बॅक वॉटर शहरात घुसल्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण झालीय.
Aug 2, 2013, 08:57 PM ISTरायगड, ठाण्यात नद्यांना पूर
रायगडमध्ये रात्रीपासून पावसाचा जोर वाढलाय. सावित्री, गांधारी नद्यांना पूर आला असून महाड शहरात पाणी शिरण्यास सुरुवात झालीय. सुकटगल्ली, मच्छिमार्केट, दस्तुरी नाका, गांधारी पुलावर पाणी आलंय.
Aug 2, 2013, 12:59 PM ISTगणपती उत्सव : कोकण रेल्वेचे बुकिंग पुन्हा फुल्ल
कोकणात जाणा-या गणपती स्पेशल ट्रेनचं बुकिंग अक्षरश दोन मिनिटांत फुल्ल झालंय. त्यामुळं गणेशोत्सवासाठी कोकणात जाणा-या अनेक प्रवाशांचा पुन्हा एकदा हिरमोड झालाय.
Jul 31, 2013, 01:55 PM ISTकोकणच्या चाकरमान्यांना `मरे` पावली!
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणा-या चाकरमान्यांना मध्य रेल्वे पावली आहे. गणेशोत्सवासाठी 4 ते 22 सप्टेंबर या कालावधीत रेल्वेच्या 120 जादा फे-या यंदा धावणार आहे.
Jul 29, 2013, 11:46 PM ISTकोयना, वारणा परिसरातील गावांना धोका
राज्यातल्या वेगवेगळ्या भागात पावसाचा जोर कायम आहे. कोयना आणि वारणा धऱणातून पाणी सोडल्यामुळे कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पातळीत वाढ झालीय. सांगलीत आयर्विन पुलाजवळ कृष्णेची पातळी ३४ फुटांवर गेलीय.
Jul 26, 2013, 09:05 AM ISTरायगडमध्ये पूर, रत्नागिरीत भीती कायम
रायगड जिल्ह्यालाही मुसळधार पावसाने झोडपून काढलंय. जिल्ह्याच्या कर्जत, खालापूर, खोपोली परिसरात मुसळधार पावसाने रुद्ररूप धारण केल्याने पाताळगंगा नदीला महापूर आलाय. पाताळगंगा नदीकाठच्या भातशेतीत पाणी साचलंय. तर रत्नागिरी जिल्ह्यात पुराची स्थिती कायम आहे.
Jul 25, 2013, 04:48 PM IST