राऊत, राणे आज भरणार अर्ज, राणेंचा राष्ट्रवादीला इशारा
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील काँग्रेस आणि शिवसेनेचे उमेदवार आज आपला अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळं दोन्ही उमेदवारांकडून शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे. शिवसेनेचे विनायक राऊत दुपारी १२ वाजता नामांकन अर्ज दाखल करणार असून यासाठी शिवसेनेकडून संजय राऊत आणि भाजपचे विनोद तावडे उपस्थित राहणार आहेत.
Mar 25, 2014, 09:25 AM ISTपैशांचा पाऊस आणि लैंगिक शोषण
रत्नागिरी जिल्ह्यात दापोलीत पैशाचा पाऊस पाडण्याचं आमीष दाखवून गरजू, निराधार महिलांना जाळ्यात ओढणा-या टोळीचा पर्दाफाश झालाय.
Feb 19, 2014, 03:57 PM ISTहवामान बदलाने कोकणातील आंबा, काजू पिक धोक्यात
कोकणात गेले दोन दिवस काही भागात पावसाच्या हलक्या सरींबरोबरच वातावरण ढगाळ झालं आहे. या बदललेल्या वातावरणाचा फटका हापूसला बसण्याची शक्यता आहे. सध्या आंब्याचा मोहोर तयार होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
Jan 22, 2014, 11:15 AM ISTतटकरे-जाधव वाद केवळ चार भिंतीत मिटला, रत्नागिरीत वाद कायम
कोकणातील राष्ट्रवादीच्या दोन मात्तबर नेत्यांमधला वाद राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी मिटवला खरा. पण या दोन नेत्यांच्या वादात ज्या कार्यकर्त्यांनी उड्या घेतल्या त्यांच्यातील वाद मात्र अजून मिटलेला दिसत नाहीय.
Jan 17, 2014, 07:57 AM ISTनववर्षाच्या स्वागतासाठी कोकण हाऊसफुल्ल
कोकणचा सौंदर्य प्रत्येकाला खुणावतोच. निळा क्षार समुद्र किनारा आणि इथलं सौदर्य अनेक पर्यटकांना आकर्षित करतं. त्यामुळेच यावर्षी नववर्षाचं स्वागत कोकणात करावं याच बेताने. सध्या कोकण पर्यटकांनी हाऊसफुल झालय. एमटीडीसीची सर्व रिसॉर्ट आणि हॉटेल्सची आरक्षण जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत फुल्ल झालीयेत.
Dec 31, 2013, 07:39 AM ISTथर्टी फर्स्टसाठी कोकणात पर्यटकांची गर्दी
थर्टी फर्स्टसाठी कोकणात पर्यटकांची गर्दी होवू लागलीय. कोकणातले समुद्रकिनारे सध्या गजबजलेत. पर्यटकांमुळे हॉटेलचे दरही दुप्पटीने वाढलेत. यंदा पर्यटकांची सर्वाधिक पसंती तारकर्ली बीचला. तसेच रत्नागिरीलाही पसंती आहे. गणपतीपुळे येथेही अशी परिस्थिती आहे.
Dec 26, 2013, 11:17 AM ISTसावंतवाडीतील कार अपघातात ५ ठार, दोन जखमी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी जवळील मळगाव येथे झालेल्या भीषण कार अपघातात पाच जण ठार झाले. कारचा टायर फुटल्याने ती दरीत कोसळली. या अपघातात बालकांसह पाच जण ठार झालेत. तर दोघे जखमी झालेत.
Dec 21, 2013, 11:21 PM ISTरत्नागिरीत आढळला दुर्मिळ जातीचा काळा बिबट्या
रत्नागिरी जिल्ह्यात तोरणा भाटी परिसरात अतिशय दुर्मिळ जातीचा काळा बिबट्या आढळला आहे. गावकऱ्यांना सकाळपासून बिबट्याच्या डरकाळ्या ऐकू येत होत्या, मात्र त्याचा मागमूस लागत नव्हता. अचानक काही गावक-यांना तो विहिरीत पडलेला दिसल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला.
Dec 19, 2013, 06:43 PM ISTकोकणचा विकास कुठं? शरद पवारांचा सरकारला घरचा आहेर
निसर्गानं दोन्ही हातानं सौंदर्य बहाल केलेल्या कोकणाचा हवा तसा विकास झालेला नाही.. कोकणचा पर्यटन विकास होणं गरजेचं असून त्यासाठी महामार्ग आणि जलमार्गाचाही विकास होणं महत्वाचं असलंयाचं म्हणत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवारांनी राज्य सरकारला घरचाच आहेर दिलाय...
Dec 14, 2013, 10:36 PM ISTऊर्जेसाठी जैतापूर प्रकल्प गरजेचा - शरद पवार
कोकणात पर्यावरणपूरक उद्योगांची आवश्यकता आहे. अशा उद्योगांना ऊर्जा मिळण्यासाठी जैतापूरसारखे अणू ऊर्जा प्रकल्पच उपयोगी असतील, असं पवार म्हणालेत. कोकणात पर्यटन विकासासाठी महामार्ग तसंच जलमार्ग विकास होणे आवश्यक आहे असं पवार म्हणाले.
Dec 14, 2013, 03:11 PM ISTकोकण प्रश्नावर राणेंना भुजबळांचा पाठिंबा
कोकणच्या इको झोनवर कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. इको झोनच्या निर्णयामुळे कोकणवासीयांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे या निर्णयाचा फेरविचार होणं गरजेचं आहे, असं भुजबळ यांनी म्हटलंय. भुजबळ यांनी उद्योगमंत्री नारायरण राणे यांना पाठिंबा दिल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे काँग्रेसविरोधात राष्ट्रवादीही उतरल्याचे चित्र आहे.
Dec 6, 2013, 04:33 PM ISTनारायण राणे यांचा तोल सुटला, तर कोकणात नक्षलवाद
कस्तुरीरंगन समितीच्या शिफारशींना विरोध करताना उद्योगमंत्री नारायण राणे यांचा तोल सुटलाय. रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड इथं एका जाहीर कार्यक्रमात बोलताना त्यांनी कोकणातली गावं इकोफ्रेंडली घोषित झाली, तर इथं नक्षलवाद पसरेल असं म्हटलंय.
Dec 5, 2013, 07:00 PM ISTराणेंच्या नाराजीचा स्फोट, राजीनामा देईन आणि आंदोलन करीन!
कोकणातील १९२ गावे इको सेंसेटीव्ह जाहीर केल्यामुळे उद्योगमंत्री नारायण राणे प्रचंड नाराज झाले आहेत. राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत राणे यांनी कस्तुरीरंगन समितीला पर्यायाने सरकारला गंभीर इशारा दिला आहे. मी राजीनामा देईन आणि थेट आंदोलन करीन, असे स्पष्ट बजावले आहे. त्यामुळे पुन्हा राणे यांनी दंड थोपटल्याचे दिसत आहे.
Dec 4, 2013, 07:26 PM IST`दादा`गिरी करणाऱ्यांचे हात मुळासकट उखडून टाकू - उद्धव ठाकरे
माझ्या शिवसैनिकांच्या वाट्याला जाऊ नको. याचा चांगला परिणाम होणार नाही. येथे काँग्रेसची दादागिरी चालणार नाही. उगारणारा हात मुळासकट उखडून टाकू, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना उद्योग मंत्री नारायण राणे यांना दिला.
Nov 27, 2013, 08:17 AM ISTते दिवस राहिले नाहीत....(लेख)
दसरा सण संपला की दिवाळीचा सण. दिवाळी सण हा प्रकाशाचा, आनंदाचा, उत्साहाचा आणि जल्लोषाचा. दिवाळीचा पहिला दिवस धनत्रयोदशी.कोकणातील दिवाळी आजही आगळी-वेगळी अशीच आहे. ग्रामीण भागाचे झपाट्याने शहरीकरण होत असलं तरी काही परंपरा आजही टिकून आहेत.
Nov 1, 2013, 05:25 PM IST