अशोक चव्हाण

अशोक चव्हाण

अशोक चव्हाणकाँग्रेस

राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांचे सुपुत्र आहेत. मुंबई झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर विलासराव देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर अशोक चव्हाण हे राज्याचे २० वे मुख्यमंत्री झाले होते. ८ डिसेंबर २००८ ते मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात काँग्रेसला पुन्हा सत्ता मिळाली. त्यानंतर मुख्यमंत्रीपदाची माळ पुन्हा त्यांच्याच गळ्यात पडली. सध्या ते महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. नांदेड म्हणजे अशोक चव्हाण असं एक समीकरण तयार झालं आहे. खासदार, आमदार, जिल्हा परिषद आणि महापालिका साऱ्याच ठिकाणी अशोक चव्हाणांनी वर्चस्व निर्माण केलं. पुढे आदर्श घोटाळ्यात अडकल्याने अशोक चव्हाण यांचं मुख्यमंत्रीपद गेलं. त्यानंतर राजकीय पुनर्वसनाची संधी अशोक चव्हाण शोधत होते.

नांदेडचा गड कायम राखणे हे अशोक चव्हाण यांच्यापुढे मोठं आव्हान होतं. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला आणि खासदार झाले. आगामी लोकसभा निवडणुकीत ते पुन्हा मैदानात उतरतील का याबाबत शंका आहे. खासदार अशोक चव्हाण यांनी विधानसभेची निवडणूक लढवावी आणि महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रीय असावं अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे. त्यामुळे काँग्रेसकडून लोकसभेसाठी चव्हाण यांच्या कुटुंबातील सदस्याला उमेदवारी मिळू शकते. अशोक चव्हाण यांच्या पत्नी किंवा २ कन्यांपैकी एकीचं राजकारणात लॉन्चिंग केलं जाऊ शकतं.

आणखी बातम्या

कधी एकेकाळी CM असणारे देवेंद्र फडणवीस JUNIOR पद स्विकारणारे पाचवे माजी मुख्यमंत्री

कधी एकेकाळी CM असणारे देवेंद्र फडणवीस JUNIOR पद स्विकारणारे पाचवे माजी मुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस यांच्याआधी 'या' चार नेत्यांनी मुख्यमंत्री होऊनसुद्धा JUNIOUR पद भूषवलं, जाणून घ्या कोण आहेत ते

Jul 01, 2022, 15:18 PM IST
महाविकास आघाडी सरकारबाबत काँग्रेसचं मोठं वक्तव्य, अशोक चव्हाण म्हणाले...

महाविकास आघाडी सरकारबाबत काँग्रेसचं मोठं वक्तव्य, अशोक चव्हाण म्हणाले...

बंडखोर आमदारांना आवाहन करत मुंबईत या, महाविकास आघाडीतून बाहेर पडतो, असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे. त्यावर काँग्रेस नेते आणि मंत्री अशोक चव्हाण यांनी आपलं मत मांडलं आहे. 

Jun 23, 2022, 18:25 PM IST
'राहुल गांधी देशाचा आवाज, सूडबुद्धीची कारवाई सहन करणार नाही' काँग्रेस आक्रमक

'राहुल गांधी देशाचा आवाज, सूडबुद्धीची कारवाई सहन करणार नाही' काँग्रेस आक्रमक

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, मंत्री आणि पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

Jun 16, 2022, 17:26 PM IST
Nanded Builder Sanjay Biyani Wife Angry Shouting For Justice AShok Chavan Reverts

VIDEO । बिल्डरच्या हत्येनंतर नांदेड बंद

Nanded Builder Sanjay Biyani Wife Angry Shouting For Justice AShok Chavan Reverts

Apr 06, 2022, 15:35 PM IST
Congress MLA Ashok Chavan On Sharad Pawar And UPA President

VIDEO | यूपीए अध्यक्षपदासाठी पवारांचं नाव

Congress MLA Ashok Chavan On Sharad Pawar And UPA President

Mar 29, 2022, 21:05 PM IST
Mumbai MP Sambhajiraje Chhatrapati And Ashok Chavan On Maratha Reservation Update At 04 PM

VIDEO| मराठा आरक्षणासाठी संभाजीराजेंचं उपोषण

Mumbai MP Sambhajiraje Chhatrapati And Ashok Chavan On Maratha Reservation Update At 04 PM

Feb 26, 2022, 18:30 PM IST
काँग्रेस हाच भाजपला सक्षम पर्याय! ममता बॅनर्जींच्या वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार

काँग्रेस हाच भाजपला सक्षम पर्याय! ममता बॅनर्जींच्या वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार

यूपीएचं अस्तित्व नाकारात ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसच्याच नेतृत्वाला आव्हान दिल्याची जोरदार चर्चा 

Dec 01, 2021, 19:40 PM IST
निवडणुकीच्या तोंडावर घोटाळा निघाला तर 'करेक्ट टायमिंग', प्रवीण दरेकर यांचा इशारा

निवडणुकीच्या तोंडावर घोटाळा निघाला तर 'करेक्ट टायमिंग', प्रवीण दरेकर यांचा इशारा

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आता ईडीच्या रडावर काँग्रेसचा हा बडा नेता?

Oct 22, 2021, 16:31 PM IST
भाजपाला मतदान करा आणि...! चंद्रकांत पाटील यांची अनोखी ऑफर

भाजपाला मतदान करा आणि...! चंद्रकांत पाटील यांची अनोखी ऑफर

चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या ऑफरचा अशोक चव्हाण यांनी समाचार घेतला आहे

Oct 20, 2021, 18:42 PM IST
पुढचा नंबर कोणाचा? किरीट सोमय्या नांदेडला जाणार, चंद्रकांत पाटील यांची माहिती

पुढचा नंबर कोणाचा? किरीट सोमय्या नांदेडला जाणार, चंद्रकांत पाटील यांची माहिती

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आता ईडीच्या रडावर काँग्रेसचा हा बडा नेता?

Oct 19, 2021, 22:10 PM IST