शिवसेना

शिवसेना

शिवसेनाशिवसेना

शिवसेना हा एक प्रादेशिक राजकीय पक्ष असला तरी देशाच्या राजकारणात या पक्षाला विशेष महत्त्व आहे. १९ जून १९६६ रोजी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली होती. बाळासाहेबांनंतर आता पक्षाची पूर्ण जबाबदारी उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे. आक्रमकपणा ही शिवसेनेची ओळख आहे. मराठी आणि हिंदुत्व हा शिवसेनेचा मुख्य अजेंडा आहे. शिवसेना भाजपचा पहिला मित्रपक्ष आहे. १९८४ च्या लोकसभेत शिवसेनेने भाजपसोबत हिंदुत्वाच्या मुद्द्यावर युती केली. यावेळी शिवसेनेचे मनोहर जोशी आणि वामनराव महाडिक यांनी भाजपच्याच चिन्हावर निवडणूक लढवली होती. १९९५ मध्ये महाराष्ट्रात पहिल्यांदा युतीचं सरकार आलं. २०१४ मध्ये शिवसेनेला मोठं यश मिळालं. शिवसेनेचे १९ खासदार लोकसभेवर निवडून गेले. त्यानंतर राज्यात विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला ६३ जागा मिळाल्या. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला एकूण १०,२३५,९७२ मते मिळाली. राज्यातील एकूण १९.३ टक्के मतदान शिवसेनेला मिळालं. भाजपसोबत सत्तेत असूनही विरोधकांसारखी वागणारी शिवसेना सर्वाधिक चर्चेत राहिली.

राजकीय नेते

उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरेशिवसेना