राष्ट्रवादी काँग्रेस पक्षराष्ट्रवादी
सोनिया गांधी यांच्या विदेशीपणाचा मुद्दा उपस्थित करून शरद पवार यांनी काँग्रेसला रामराम करुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्रातील चाणाक्ष नेते म्हणून ओळख असलेले शरद पवार यांनी केंद्रातील वाजपेयी सरकार एका मताने पाडले होते. राष्ट्रवादी काँग्रेस हा राजकीय पक्ष असला तरी शरद पवारांमुळे देशाच्या राजकारणात त्याला विशेष स्थान आहे. शरद पवार हे राज्यसभेवर खासदार आहेत. शरद पवार यांची मुलगी सुप्रिया सुळे या लोकसभेच्या खासदार आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे फक्त ४ खासदार निवडून आले. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यात ४१ जागा मिळाल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विधानसभा निवडणुकीत एकूण ९१,२२,२९९ मतं मिळाली. एकूण आकडेवारीच्या १७.२ टक्के मतदान राष्ट्रवादीला मिळालं. युतीचं सरकार येण्याआधी राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचं सरकार होतं. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे उपमुख्यमंत्री होते.