काँग्रेस

काँग्रेस

काँग्रेसकाँग्रेस

काँग्रेसची स्थापना २८ डिसेंबर १८८५ मध्ये ब्रिटिश राजाच्या काळात झाली. एलेन ओक्टेवियन ह्यूम, दादाभाई नौरोजी आणि दिनशा वाचा यांनी काँग्रेसची स्थापन केली होती. स्वातंत्र्यानंतर पंडीत जवाहरलाल नेहरु काँग्रेसचे पहिले पंतप्रधान झाले. त्यानंतर इंदिरा गांधी काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष आणि पंतप्रधान झाल्या. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर राजीव गांधी पंतप्रधान झाले. राजीव गांधींच्या निधनानंतर अध्यक्ष कोण? अशी चर्चा देशात सुरु झाली. एप्रिल १९९८ मध्ये सोनिया गांधी या काँग्रेसच्या अध्यक्षा झाल्या. आज सोनिया गांधींनी केवळ स्वत:चे राजकीय स्थान भक्कम केलेले नाही तर राहुल गांधी यांना राजकारणात स्थिर करुन काँग्रेसचा अध्यक्ष देखील बनवलं. सोबतच प्रियंका गांधी यांना देखील सक्रीय राजकारणात आणलं आहे. सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात २ वेळा यूपीए सरकार सत्तेत आलं. पण त्यांनी पंतप्रधानपद स्वीकारलं नाही. या काळात मनमोहन सिंग पंतप्रधान असताना काँग्रेसच्या अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्यानंतर २०१४ मध्ये त्यांना सत्तेतून पायउतार व्हावं लागलं.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला देशात फक्त ४४ जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसला १९.३ टक्के मतदान झालं होतं. २००९ मध्ये काँग्रेसला २९ टक्के मतदान मिळालं होतं. महाराष्ट्रातून काँग्रेसचे फक्त २ खासदार निवडून गेले होते. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे ४२ आमदार निवडून आले होते. काँग्रेसला एकूण ९,४९६,१४४ मतं मिळाली होती. एकूण मतदानाच्या १८ टक्के मतदान काँग्रेसला मिळालं होतं.

राजकीय नेते

अशोक चव्हाण

अशोक चव्हाणकाँग्रेस