कानोसा पश्चिम महाराष्ट्राचा : हे उमेदवार जिंकणार

| May 21, 2019, 19:44 PM IST
1/10

मावळमध्ये शिवसेनेचे श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादीकडून पार्थ पवार मैदानात होते. येथे पार्थ पवार यांचा पराभव होण्याची शक्यता आहे.

2/10

पुण्याचा कानोसा

पुण्याचा कानोसा

पुण्यातून भाजपचे गिरीश बापट यांचा विजय होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांना पराभवाचा धक्का बसण्याची शक्यता आहे.

3/10

बारामतीचा कानोसा

बारामतीचा कानोसा

बारामतीमधून राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांचा विजय होण्याची शक्यता आहे. भाजपच्या कांचन कुल यांचा पराभव होण्याची शक्यता.

4/10

शिरुरचा कानोसा

शिरुरचा कानोसा

शिरुरमधून राष्ट्रवादीचे डॉ. अमोल कोल्हे आणि शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील मैदानात होते. येथे शिवाजीराव आढळराव पाटील यांना यंदा पराभवाचा धक्का बसण्याची शक्यता आहे.

5/10

सोलापूरचा कानोसा

सोलापूरचा कानोसा

सोलापूरमध्ये काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांचा विजय होण्याची शक्यता आहे. भाजपचे जयसिद्धेश्वर स्वामी आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांचा पराभव होण्याची शक्यता आहे. 

6/10

माढ्याचा कानोसा

माढ्याचा कानोसा

माढा येथून राष्ट्रवादीचे संजय शिंदे आणि भाजपचे रणजितसिंह निंबाळकर यांच्यात लढत होती. संजय शिंदे यांचा विजय होण्याची शक्यता आहे. 

7/10

साताऱ्याचा कानोसा

साताऱ्याचा कानोसा

साताऱ्यातून राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांचा विजय निश्चित मानला जात आहे. येथून शिवसेनेचे नरेंद्र पाटील त्यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात होते.

8/10

सांगलीचा कानोसा

सांगलीचा कानोसा

सांगली मतदारसंघातून स्वाभिमान शेतकरी संघटनेचे विशाल पाटील यांचा विजय होण्याची शक्यता. तर भाजपचे संजय काका पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडाळकर यांचा पराभव होण्याची शक्यता आहे.

9/10

कोल्हापुरचा कानोसा

कोल्हापुरचा कानोसा

कोल्हापुरातून शिवसेनेचे संजय मंडलिक यांचा विजय होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक यांना पराभवाचा धक्का बसू शकतो.

10/10

हातकणंगलेचा कानोसा

हातकणंगलेचा कानोसा

हातकणंगले मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांचा विजय निश्चित मानला जात आहे. शिवसेनेचे धैर्यशिल माने येथे त्यांच्या विरोधात निवडणूक लढवत होते.