zee24taas

व्हाइट ब्रेड आणि पास्तामुळे आपण जावू शकता नैराश्यात...

व्हाइट ब्रेड आणि पास्ता खाल्ल्यानं आपण नैराश्यात जावू शकता. शरीरातील जास्त प्रमाणात असलेलं कार्बोहायड्रेट आपला तापटपणा आणि चिंता वाढवू शकते. 

Aug 11, 2015, 12:14 PM IST

मंगळावर दिसली महिलेची आकृती?

अमेरिकन स्पेस एजंसी नासाच्या क्यूरियोसिटीनं मंगळावर घेतलेले फोटो पाठवलेत. हे फोटो पाहून आपली उत्सुकता अधिक वाढेल. कारण क्यूरियोसिटीनं मंगळ ग्रहावरील पाढवलेल्या एका फोटोमध्ये एका महिलेची आकृती दिसतेय. 

Aug 11, 2015, 11:43 AM IST

दाऊदला दोन वर्षांपूर्वी भारतात यायचं होतं पण...

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम २०१३ मध्ये भारतात येण्याची इच्छा व्यक्त केली होती. याविषयी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन यांनी चर्चा करून दाऊदच्या अटीं स्वीकारण्यास नकार दिल्याचं वृत्त आज एका प्रसिद्ध इंग्रजी वृत्तपत्रानं दिलंय. 

Aug 11, 2015, 10:23 AM IST

नाशिकमध्ये पुन्हा जळीतकांड, ४ बाईक जाळल्या

नाशिकच्या इंदिरानगर भागात आज पुन्हा एकदा जळीतकांड घडलंय. इंदिरानगरातल्या संस्कृती अपार्टमेंट खाली चार दुचाकी जाळण्यात आल्यात. 

Aug 11, 2015, 10:13 AM IST

मुंबईत पुन्हा हिट अँड रन, बाईकस्वार २२ वर्षीय उमेश वेदकरचा मृत्यू

बांद्रा रेक्लमेशन परिसरात एका भराधाव कारनं रात्री एका तरुणाला जोरदार धडक दिली. या अपघातात २२ वर्षीय उमेश वेदकरचा मृत्यू झालाय. दुचाकीवर मागे बसलेला स्वप्निल गायकवाडही गंभीर जखमी झालाय. 

Aug 11, 2015, 09:44 AM IST

दिग्दर्शक राजू हिरानींचा अपघात, आयसीयूमध्ये उपचार सुरू

पीकेचे दिग्दर्शक राजू हिराणी यांचा अपघात झालाय. मध्यरात्री बाईक चालवतांना वळणावर घसरून त्यांचा अपघात झाला, त्यात त्यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर लिलावती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. 

Aug 11, 2015, 09:32 AM IST

भारतीय वंशांचे सुंदर पिचाई गूगलचे नवे सीईओ

गूगलनं कंपनीमध्ये मोठे फेरबदल केले आहेत. मूळचे भारतीय असलेले सुंदर पिचाई गूगलचे नवे सीईओ झाले आहेत. सोबतच गूगलनं आपलं स्वरूप बदललंय.

Aug 11, 2015, 09:02 AM IST

उत्तर भारतातील अनेक शहरांमध्ये भूकंपाचे धक्के

उत्तर भारतामध्ये आज भूकंपाचे धक्के जाणवले. दिल्ली आणि एनसीआरमध्ये जवळपास पावणे चार वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे धक्के श्रीनगरमध्येही जाणवले. भूकंपानं आतापर्यंत कोणत्याही प्रकारचं नुकसान झाल्याची बातमी नाहीय.

Aug 10, 2015, 04:16 PM IST

धावत्या लोकलमध्ये तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमाला अटक

धावत्या लोकलमध्ये तरूणीवर बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमाला अटक करण्यात रेल्वे पोलिसांना यश आलंय. गुरूवारी रात्री त्यानं लेडीज डब्यात शिरून २२ वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला होता. 

Aug 10, 2015, 01:26 PM IST

उधमपूर हल्ल्याच्या ४५ दिवस आधी गुफेत लपून होता दहशतवादी नावेद

जम्मू-काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात मागील बुधवारी बीएसएफ जवानांच्या तुकडीवर हल्ला केल्यानंतर जिवंत पकडला गेलेला दहशतवादी मोहम्मद नावेद याकूब याच्या चौकशीमध्ये अनेक महत्त्वाची माहिती पुढे आलीय. या हल्ल्यात दोन कॉन्स्टेबल शहीद झाले.

Aug 10, 2015, 01:07 PM IST

जेव्हा निर्मात्यानं २० अनोळखी व्यक्तींना एकमेकांना किस करायला सांगितलं

पूर्वीच्या काळी चित्रपट निर्माते कशी ऑडिशन घ्यायचे हे आपण काही फोटोंच्या माध्यमातून पाहिलं होतं. आता एक आश्चर्यकारक व्हिडिओ समोर आलाय. चित्रपट निर्माते याजीया पिलियव्हा  (Tatia Pilieva) यांचा हा चित्रपट आहे. 

Aug 10, 2015, 12:25 PM IST

वायरल व्हिडिओ: जेव्हा म्हशीने सिंहाला ५ मीटर उंचावर फेकलं

एक आश्चर्यकारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल झालाय. हा जंगलातील व्हिडिओ आहे. म्हशींच्या एका कळपावर सिंहानं हल्ला केला. तेव्हा एका म्हशीनं आपल्या शिंगांनी सिंहाला हवेत फेकलं. सिंह जवळपास पाच मीटर उंचावर फेकला गेला. 

Aug 10, 2015, 11:43 AM IST

क्रिकेटपटू भुवनेश्वर कुमारला जीवे मारण्याची धमकी

 भारतीय क्रिकेट टीमसोबत श्रीलंका दौऱ्यावर गेलेला फास्ट बॉलर भुवनेश्वर कुमार आणि त्याच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी मिळालीय. एका जमीन खरेदी प्रकरणात ही धमकी त्यांना मिळाल्याचं कळतंय. मेरठ पोलीस स्टेशनमध्ये याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास सुरू आहे.

Aug 10, 2015, 11:19 AM IST