कॅलिफोर्निया: गूगलनं कंपनीमध्ये मोठे फेरबदल केले आहेत. मूळचे भारतीय असलेले सुंदर पिचाई गूगलचे नवे सीईओ झाले आहेत. सोबतच गूगलनं आपलं स्वरूप बदललंय.
जगातील सर्वात मोठं सर्च इंजिन कंपनीनं अल्फाबेट इंक नावाची नवी कंपनी स्थापन केलीय आणि गूगल आता या कंपनीचा एक भाग असेल. गूगल अल्फाबेटची सहाय्यक कंपनी म्हणून काम करेल. अल्फाबेटचे सीईओ गूगलचे फाऊंडर लॅरी पेज असतील.
गूगलचे को-फाउंडर लॅरी पेज यांनी ब्लॉग पोस्ट करून गूगलमधील फेरबदलांची माहिती दिली. ब्लॉग पोस्टमध्ये त्यांनी सांगितलं की, गूगल आता 'स्लिमड डाउन' कंपनी झालीय आणि अल्फाबेट इंक नावाची नवी कंपनी बनवली गेलीय. सोबतच गूगल या नव्या कंपनीचा भाग आहे.
लॅरी पेजनं आपल्या पोस्टमध्ये सुंदर पिचाई यांच्या नेतृत्त्वात गूगल अधिक स्वच्छ आणि चांगला कारभार करेल, असा विश्वास त्यांनी दर्शवलाय.
कोण आहे सुंदर पिचाई?
४३ वर्षीय सुंदर यांनी २००४मध्ये गूगलमध्ये नोकरी सुरू केली होती. सुंदर पिचाई यांनी आयआयटी खडकपूरहून मेटालर्जिकल इंजीनिअरिंगचं शिक्षण घेतलं. यानंतर ते स्टॅनफर्ड विद्यापीठ आणि वार्टन बिझनेस स्कूलमध्येही गेले होते.
११ वर्षांपासून गूगलमध्ये काम करणारे सुंदर पिचाई टेक वर्ल्डमधील मोठं नाव आहे. मागील वर्षी त्यांना कंपनीच्या नव्या प्रॉडक्ट चीफ म्हणून नियुक्त केलं गेलं होतं. पिचाई सीनिअर वाईस प्रेसिडंट होते. त्यांच्याजवळ अँड्रॉइड, क्रोम आणि अॅप्स डिव्हिजनचीही जबाबदारी होती. अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम डेव्हलपमेंटमध्ये यांची महत्त्वाची भूमिका होती.
गेल्यावर्षी ट्विटर आणि मायक्रोसॉफ्टनं सुद्धा त्यांना आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न केला होता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.