Baroda vs Tamil Nadu: भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने बुधवारी आपल्या दमदार खेळीने चाहत्यांची मने जिंकली. इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2024 (Syed Mushtaq Ali Trophy) मध्ये झालेल्या सामन्यात हार्दिकने 30 चेंडूत 69 धावांची तुफानी खेळी खेळली. हार्दिकने त्याच्या या जबरदस्त फलंदाजीने आपल्या संघाला विजय मिळवून दिला. हार्दिकने आपल्या आक्रमक खेळीत 4 चौकार आणि 7 षटकार मारले.
तामिळनाडू विरुद्ध बडोदा असा सामना खेळवला गेला. या सामन्यात तामिळनाडूने 20 षटकांत 6 गडी गमावून 221 धावा केल्या होत्या. नारायण जगदीशनने अर्धशतक तर विजय शंकरने 22 चेंडूत 42 धावा केल्या. याला प्रत्युत्तरात देत बडोद्याने सहा गडी गमावून १५२ धावा केल्या. मात्र हार्दिक पंड्याने 30 चेंडूत 69 धावांची शानदार खेळी करत संघाला विजयापर्यंत नेले. बडोद्याच्या संघाला विजयासाठी नऊ धावांची गरज असताना हार्दिक धावबाद झाला. मात्र अतित शेठने शेवटच्या चेंडूवर चौकार मारून संघाला विजय मिळवून दिला.
हे ही वाचा: Bajrang Punia: बजरंग पुनियाची कारकीर्द संपली? ऑलिम्पिक पदक विजेत्यावर NADA ने घातली 4 वर्षांची बंदी
तामिळनाडू विरुद्ध बडोदाच्या सामन्यादरम्यान चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) गोलंदाज गुरजपनीत सिंगच्या षटकात अष्टपैलू हार्दिकने दमदार फलंदाजी केली. तामिळनाडूचा वेगवान गोलंदाज गुर्जपनीतला नुकतेच चेन्नईने २०२५ च्या आयपीएल मेगा लिलावात सातपट अधिक पैसे देऊन विकत घेतले आहे. गुर्जपनीतची मूळ किंमत ३० लाख रुपये होती, पण सीएसकेने त्याला २.२ कोटी रुपयांना विकत घेतले आहे.
हे ही वाचा: IPL लिलावात नवऱ्याला खरेदी न केल्याने संतापली पत्नी, शाहरुखच्या टीमवर काढला राग!
Victory for Baroda!
What a finish
A last-ball from Atit Sheth seals the win!
Hardik Pandya lit up Indore with 69-run blitz as Baroda chased down 222 against Tamil Nadu
The celebrations say it all
Scorecard https://t.co/DDt2Ar20h9#SMAT | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/A6tr6uDazl
— BCCI Domestic (@BCCIdomestic) November 27, 2024
हे ही वाचा: तुमचा आवडता खेळाडू यंदा कोणत्या संघात? बघा IPL 2025चे संघ आणि खेळाडूंची यादी
हार्दिक पांड्याने बडोद्याच्या डावाच्या 17व्या षटकात सलग चार षटकार आणि एक चौकार लगावला आणि 29 धावा केल्या. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2024 मध्ये हार्दिक खूप फॉर्ममध्ये आहे. यापूर्वी त्याने गुजरातविरुद्ध 74 धावांची नाबाद खेळी खेळली होती. यानंतर त्याने उत्तराखंडविरुद्धही नाबाद ४१ धावा केल्या.