नवी दिल्ली: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम २०१३ मध्ये भारतात येण्याची इच्छा व्यक्त केली होती. याविषयी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन यांनी चर्चा करून दाऊदच्या अटीं स्वीकारण्यास नकार दिल्याचं वृत्त आज एका प्रसिद्ध इंग्रजी वृत्तपत्रानं दिलंय.
पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी मात्र आपल्याला काही आठवत नाही, असं स्पष्टीकरण दिलंय. वृत्तपत्रातल्या बातमीनुसार, २०१३मध्ये दाऊद मूत्रपिंडाच्या गंभीर आजारानं त्रस्त होता. त्यावेळी त्याला आपल्या कुटुंबासोबत भारतात राहण्याची इच्छा होती. पण त्यानं घातलेल्या अटींवर त्याच्याविरोधात खटला चालवणं भारतात अशक्य असल्याचं सरकारनं म्हटल्यानं दाऊद भारतात परतला नाही.
विशेष म्हणजे दाऊदची ही ऑफर काँग्रेसच्या एका ज्येष्ठ वकीलानंच काँग्रेस श्रेष्ठींपर्यंत पोहचवल्याचंही बातमीत म्हटलयं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.