धावत्या लोकलमध्ये तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमाला अटक

धावत्या लोकलमध्ये तरूणीवर बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमाला अटक करण्यात रेल्वे पोलिसांना यश आलंय. गुरूवारी रात्री त्यानं लेडीज डब्यात शिरून २२ वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला होता. 

Updated: Aug 10, 2015, 01:26 PM IST
धावत्या लोकलमध्ये तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमाला अटक title=

मुंबई: धावत्या लोकलमध्ये तरूणीवर बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमाला अटक करण्यात रेल्वे पोलिसांना यश आलंय. गुरूवारी रात्री त्यानं लेडीज डब्यात शिरून २२ वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला होता. 

पश्चिम रेल्वे मार्गावर चर्नीरोड ते ग्रॅंटरोड दरम्यान धावत्या लोकलमध्ये रात्री अकरा वाजता हा भामटा शिरला. लोकलमध्ये सुरक्षा रक्षक नसल्याचा फायदा घेत त्यानं २२ वर्षीय तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. ग्रँटरोड स्टेशन येताच तो उडी मारून पसार झाला. मात्र चर्नीरोडवरील सीसीटीव्हीत तो कैद झाला होता.

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला होता आणि आज त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.