IPL ऑक्शनमध्ये राहिला Unsold; पठ्ठयानं दुसऱ्याच दिवशी मैदानात काढला राग, पंतचा रेकॉर्ड धुळीस मिळवला

IPL ऑक्शनमध्ये अनेक खेळाडूंचं नशीब चमकलं आणि त्यांच्यावर फ्रेंचायझींनी कोट्यवधी आणि लाखो रुपये खर्च करून आपल्या संघात घेतलं. तर काही खेळाडू मात्र अनसोल्ड राहिले.

पुजा पवार | Updated: Nov 28, 2024, 03:39 PM IST
IPL ऑक्शनमध्ये राहिला Unsold; पठ्ठयानं दुसऱ्याच दिवशी मैदानात काढला राग, पंतचा रेकॉर्ड धुळीस मिळवला title=
(Photo Credit : Social Media)

IPL 2025 Auction : जगातील सर्वात लोकप्रिय आणि मोठ्या टी 20 लीगपैकी एक असणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2025) 18 व्या सीजनसाठी नुकतंच मेगा ऑक्शन पार पडलं. या ऑक्शनमध्ये अनेक खेळाडूंचं नशीब चमकलं आणि त्यांच्यावर फ्रेंचायझींनी कोट्यवधी आणि लाखो रुपये खर्च करून आपल्या संघात घेतलं. तर काही खेळाडू मात्र अनसोल्ड राहिले. गुजरातचा खेळाडू उर्विल पटेल (Urvil Patel) हा देखील या अनसोल्ड खेळाडूंपैकीच एक आहे. मात्र अनसोल्ड राहिलेल्या या खेळाडूने दुसऱ्याच दिवशी सैयद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये दमदार शतक ठोकून खळबळ उडवून दिली आहे. 

उर्विल पटेल हा गुजरातकडून सैयद मुश्ताक अली ट्रॉफी 2024 मध्ये खेळत आहे. उर्विलने या स्पर्धेत 28 बॉलमध्ये शतक ठोकून ऋषभ पंतचा रेकॉर्ड मोडला. यामुळे तो आता भारतासाठी T20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक झळकावणारा फलंदाज ठरला आहे. याशिवाय जगातील सर्वात वेगवान टी-20 शतक झळकावणारा तो दुसरा फलंदाज ठरला. 2018 मध्ये दिल्लीकडून हिमाचल प्रदेश विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात ऋषभ पंतने 32 चेंडूत शतक ठोकले होते. 

उर्विलचं दमदार शतक : 

उर्विलने 35 बॉलमध्ये 7 चौकार आणि 12 षटकार ठोकून 113 धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने 28 बॉलमध्ये शतक ठोकले होते. रन चेज करताना त्याने ही जबरदस्त खेळी केली. उर्विल पटेल हा आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचा भाग होता, मात्र त्याला आयपीएलमध्ये पदार्पणाची संधी मिळाली नाही. तसेच ऑक्शनपूर्वी त्याला संघाने रिलीज केले. 

हेही वाचा : IPL ऑक्शनमुळे भारत सरकारची चांदीच चांदी, तिजोरीत जमा होणार तब्बल 900000000 रुपये, पण ते कसं?

 

टी20 क्रिकेटमध्ये जगातील वेगवान शतक : 

साहिल चौहान - 27 बॉल - एस्टोनिया विरुद्ध साइप्रस, 2024

उर्विल पटेल - 28 बॉल - गुजरात विरुद्ध त्रिपुरा, 2024

क्रिस गेल - 30 बॉल- आरसीबी विरुद्ध पुणे वॉरियर्स इंडिया, 2013.

गुजरातने 8  विकेट्सने जिंकला सामना : 

सैयद मुश्ताक अली ट्रॉफी 2024 सुरु असून यात गुजरात विरुद्ध त्रिपुरा यांच्यात खेळवण्यात आलेल्या सामन्यात गुजरातने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पहिले फलंदाजीसाठी उतरलेल्या संघाला त्रिपुराने 20 ओव्हरमध्ये 155/8 धावा केल्या. यात त्रिपुराचा फलंदाज श्रीदाम पॉल सर्वाधिक 49 बॉलमध्ये 57 धावा केल्या. तर गुजरातने विजयाचे लक्ष 10.2 ओव्हरमध्ये पूर्ण केले. यात उर्विलने शतक ठोकलं तर आर्या देसाई 24 बॉलमध्ये 38 धावा केल्या.