क्रिकेटपटू भुवनेश्वर कुमारला जीवे मारण्याची धमकी

 भारतीय क्रिकेट टीमसोबत श्रीलंका दौऱ्यावर गेलेला फास्ट बॉलर भुवनेश्वर कुमार आणि त्याच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी मिळालीय. एका जमीन खरेदी प्रकरणात ही धमकी त्यांना मिळाल्याचं कळतंय. मेरठ पोलीस स्टेशनमध्ये याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास सुरू आहे.

Updated: Aug 10, 2015, 11:19 AM IST
क्रिकेटपटू भुवनेश्वर कुमारला जीवे मारण्याची धमकी  title=

मेरठ:  भारतीय क्रिकेट टीमसोबत श्रीलंका दौऱ्यावर गेलेला फास्ट बॉलर भुवनेश्वर कुमार आणि त्याच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी मिळालीय. एका जमीन खरेदी प्रकरणात ही धमकी त्यांना मिळाल्याचं कळतंय. मेरठ पोलीस स्टेशनमध्ये याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास सुरू आहे.

जिल्हा पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं, भुवनेश्वरचे वडील करिणपाल सिंह यांनी बुलंदशहरच्या बरारी गावातील रणवीर सिंह यांच्याकडून ८० लाख रुपयांमध्ये जमिनीचा व्यवहार केला होता. पोलिसांच्या मते भुवनेश्वरच्या वडिलांनी ही रक्कम इंटरनेट बँकिंगद्वारे जमा केली होती. 

या व्यवहाराचा करार म्हणजे सेल डीड एप्रिलमध्ये होणार होती. पण एका हत्येच्या आरोपात बुलंदशहरात अटकेत असलेल्या रणबीरनं त्यावर सही केली नाही.

भुवनेश्वरच्या वडिलांनी आरोप केलाय की, रणवीर सिंह आणि त्याच्या कुटुंबियांनी सेल डीड करायला नकार दिला. तसंच आरोपी पैसे परत करायलाही तयार नाहीय. जेव्हा भुवनेश्वर आणि त्याचे वडील पैसे मागण्यासाठी रणवीर सिंहच्या घरी गेले. तेव्हा त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली. आता किरणपाल सिंह यांनी रणवीर सिंहसह पाच जणांविरोधात तक्रार नोंदवलीय. भुवनेश्वर कुमार आपल्या कुटुंबियांसह मेरठच्या इंचौली क्षेत्रातील गंगानगर भागात राहतो. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.