नवी दिल्ली: उत्तर भारतामध्ये आज भूकंपाचे धक्के जाणवले. दिल्ली आणि एनसीआरमध्ये जवळपास पावणे चार वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे धक्के श्रीनगरमध्येही जाणवले. भूकंपानं आतापर्यंत कोणत्याही प्रकारचं नुकसान झाल्याची बातमी नाहीय.
पंजाबमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. दिल्ली आणि एनसीआरमध्ये जेव्हा भूकंप आला तेव्हा लोकांना हलके धक्के जाणवले. भूकंपाच्या भीतीनं लोकं घर आणि ऑफिस बाहेर आले. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ६.२ नोंदवली गेली.
भूकंपाचे धक्के ३.३३ पासून ३.३८ वाजता जाणवले. पाकिस्तान-अफगाणिस्तानच्या बॉर्डरवर भूकंपाचा केंद्रबिंदू आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.