मुंबई: व्हाइट ब्रेड आणि पास्ता खाल्ल्यानं आपण नैराश्यात जावू शकता. शरीरातील जास्त प्रमाणात असलेलं कार्बोहायड्रेट आपला तापटपणा आणि चिंता वाढवू शकते.
धान्य आणि भाज्या खाल्ल्यानं नैराश्याची भिती कमी
एका रिसर्चनुसार व्हाइट ब्रेड, पास्ता सारखे पदार्थ खाल्ल्यानं आपण डिप्रेशनमध्ये जावू शकतो. या दोन्ही पदार्थांनी शरीरात हार्मोनल प्रतिक्रिया होतात ज्या रक्तातील साखरेचं प्रमाण कमी करतं. त्यामुळं चिडचिडपणा, थकवा आणि नैराश्य वाढल्याचे लक्षणं अनेक लोकांमध्ये दिसायला लागतात.
हानिकारक कार्बोहायड्रेट लठ्ठपणा आणि निद्रानाशासारख्या समस्या वाढवतात
अमेरिकन जर्नलमध्ये छापून आलेल्या एका शोधानुसार ब्रिटनमध्ये प्रति १०० पैकी तिघं नैराश्याचे शिकार होतात. जे व्हाइट ब्रेड आणि पास्ता सारखे हानिकारक कार्बोहायड्रेट्समुळे या समस्या निर्माण होतात. या हानिकारक कार्बोहायड्रेट्समुळे लठ्ठपणा, थकवा आणि निद्रानाशासारख्या समस्यांमध्ये वाढ होऊ शकते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.