shiv sena

बाळासाहेब ठाकरेंचा जन्मदिवस असेल ‘प्रतिज्ञा दिन’!

२३ जानेवारी बाळासाहेब ठाकरेंचा जन्मदिवस... त्यांचा जन्मदिवस शिवसेनेकडून प्रतिज्ञा दिन म्हणून साजरा केला जाणारेय... त्यानिमित्त शिवसेनेकडून शक्तीप्रदर्शन करण्यात येणारेय.

Jan 13, 2014, 10:58 AM IST

कोल्हापुरात शिवसेनेचं ‘टोल’फोड, आज बंदची हाक

टोलवसुलीच्या विरोधात आज शिवसेनेनं कोल्हापूर बंदची हाक दिलीय. कोल्हापूरकरांच्या संतापाचा पुन्हा उद्रेक झाला. टोलविरोधी आंदोलनला रविवारी हिंसक वळण लागलं. कोल्हापुरातील फुलेवाडी आणि शिरोली टोलनाक्यांची शिवसैनिकांनी आणि संतप्त नागरिकांनी तोडफोड केली.

Jan 13, 2014, 08:05 AM IST

टोलविरोधी आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ आणि तोडफोड

कोल्हापूर टोल प्रश्न आता चांगलाच चिघळलाय. टोलविरोधी आंदोलनाला आता हिंसक वळण लागलंय. कोल्हापुरातील फुलेवाडी आणि शिरोली टोलनाक्यांची आज शिवसैनिकांनी आणि संतप्त नागरिकांनी तोडफोड केलीय. टोल नाके पेटवण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केलाय.

Jan 12, 2014, 03:21 PM IST

खासदार राजू शेट्टी यांनी `त्या` मुद्याला दिली तिलांजली

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी राज्यातील महायुतीबरोबर जाण्याचा निर्णय घेतलाय. पण खासदार राजू शेट्टी यांनी ज्या मुद्यावर शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्याशी फारकत घेतली, त्याच मुद्याला आता शेट्टींनी तिलांजली दिल्याचं स्पष्ट होतंय.

Jan 8, 2014, 08:48 PM IST

राजू शेट्टी जातीयवादीच, आव्हाडांची टीका

राजू शेट्टींच्या महायुतीतल्या समावेशावर राष्ट्रवादी काँग्रेसनं टीका केलीय. स्वाभीमानी शेतकरी संघटनेचा खरा चेहरा उघड झालाय. जातीयवादी पक्षांबरोबर जावून आपण जातीयवादी असल्याचं त्यांनी दाखवून दिल्याची टीका राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी केलीय.

Jan 7, 2014, 07:21 PM IST

मोदींची महागर्जना... असवस्थता सेनेत!

भाजपच्या महागर्जना रॅलीला मिळालेल्या मोठ्या प्रतिसादामुळं शिवसेनेत अस्वस्थता आहे. शिवसेनेनं भाजपच्या तोडीस तोड शक्तिप्रदर्शन करावं असा मागणी वजा आग्रह पक्षाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्यापुढे धरलाय...

Jan 6, 2014, 11:00 PM IST

औरंगाबादमध्ये चंद्रकांत खैरे - संजय केनेकर यांच्यात राडा

शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे आणि भाजपचे गटनेते संजय केनेकर ३१ डिसेंबरला आमनेसामने आले. यानंतर दोघांमध्ये बाचाबाची झाल्याने जोरदार राडा झाला. हे दोन्ही नेते भिडल्याने दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याचे पाहायला मिळाले.

Jan 1, 2014, 03:53 PM IST

रिपाइंमध्ये अस्वस्थता, आठवलेंच्या पदरात नेमकं पडणार काय?

लोकसभा निवडणुका अगदी जवळ येऊन ठेपल्या असतानाही जागावाटपाबाबत काहीही चर्चा होत नसल्याबद्दल महायुतीतल्या रिपाइंमध्ये अस्वस्थता आहे. महायुतीतून बाहेर पडण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्यावर कार्यकत्यांचा दबाव वाढतोय.

Dec 31, 2013, 08:59 PM IST

नाशिकचा बालेकिल्ला शिवसेना मनसेकडून मिळवणार?

आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेनं संघटनात्मक बांधणीला सुरुवात केलीय. या बालेकिल्ल्यात होत असलेली पक्षाची वाताहत थांबवण्यासाठी उद्धव ठाकरे स्वतः लक्ष घालतायत.

Dec 30, 2013, 08:16 PM IST

लढाई पूर्वीच आदित्य ठाकरेंची माघार

मुंबई विद्यापीठाच्या स्टुडंट्स कौन्सिल निवडणुकीतून युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरेंनी माघार घेतलीय. निवडणुकीत लढण्यासाठी आमच्याकडे ब-यापैकी संख्याबळ आहे.

Dec 30, 2013, 07:10 PM IST

काँग्रेसचं सरकार चालवतं तरी कोण, उद्धव ठाकरेंचा सवाल

आदर्श प्रकरणी राज्य सरकारनं पुनर्विचार करावा, असं मत राहुल गांधी यांनी व्यक्त केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचा चांगलाच समाचार घेतला.

Dec 28, 2013, 08:58 PM IST

टीएमसीत परिवहन समिती निवडणुकीत आघाडीची बाजी

ठाणे महानगरपालिका परिवहन समिती निवडणुकीत आघाडीनं बाजी मारलीय. भाजपचे सदस्य अजय जोशी यांना आपल्या बाजूनं वळवण्यात आघाडीला यश आलंय. त्यांनी आघाडीला मत दिलंय.

Dec 23, 2013, 12:23 PM IST

हाणामारीनंतर आज परिवहन समितीची निवडणूक

आज ठाणे परिवहन समितीच्या सभापतीपदाची निवडणूक होतीये... या निवडणूकीसाठी जोरदार मोर्चे बांधणी करण्यात आलीय.

Dec 23, 2013, 08:45 AM IST

ठाण्यात मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा

ठाणे महानगरपालिकेबाहेर मनसेनं आज आंदोलन सुरु केलंय. ‘विक्रांत’ला पैसे देऊ नका ठाण्यातील मुलभूत प्रश्नांकडे लक्ष द्या, अशी भूमिका मनसेनं घेतलीये.

Dec 19, 2013, 01:58 PM IST

ठाण्यात शिवसेना - काँग्रेस, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले

ठाणे महानगरपालिकेच्या परीवहन समितीच्या निवडणुकीत शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमनेसामने आलेत. परीवहन निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. आघाडीनं फोडलेल्या शिवसेनेच्या सदस्याचा अर्ज भरताना हा प्रकार घडलाय.

Dec 18, 2013, 08:29 PM IST